Home Bibles 2 शमुवेल 9:13 · मराठी बायबल
2 शमुवेल 9:13 · मराठी बायबल

मफीबोशेथ दोन्ही पायांनी पांगळा होता. यरुशलेम येथे त्याचे वास्तव्य होते. तो नित्य राजाच्या टेबलावर भोजन करीत असे.

Cross references

2 शमुवेल 4:4

शौलाचा मुलगा योनाथान याला मफीबोशेथ नावाचा मुलगा होता. इज्रेलहून शौल आणि योनाथान यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा हा मफीबोशेथ पाच वर्षांचा होता. शत्रूच्या भीतीने त्याची दाई त्याला घेऊन पळाली. पळापळीत तिच्या हातून तो खाली पडला आणि दोन्ही पायांनी अधू झाला.

2 शमुवेल 9:3

तेव्हा राजा म्हणाला, “शौलाच्या घराण्यातील कोणी आहे काय? देवाच्या कृपेचा लाभ त्याला मिळाला पाहिजे.” सीबा राजाला म्हणाला, “योनाथानचा मुलगाच आहे. तो दोन्ही पायांनी पांगळा झाला आहे.”

2 शमुवेल 9:7

त्याला दावीद म्हणाला, “भिऊ नको. माझा तुझ्यावर लोभ आहे. तुझ्या वडीलांसाठी मी एवढे करीन. तुझे आजोबा शौल यांची सर्व जमीन मी तुला परत देईन. माझ्या पंकतीला नेहमी बसण्याचा मान तुला मिळेल.”

2 शमुवेल 9:10

त्याची जमीन तू कसायची. तुझी मुले आणि सेवक यांनी एवढे केले पाहिजे. तुम्ही शेतात पीक काढा म्हणजे तुझ्या मालकाच्या नातवाचा त्यावर निर्वाह होईल. पण तो नेहमी माझ्या पंक्तीला जेवेल.”सीबाला पंधरा मुलगे आणि वीस नोकर होते.

2 शमुवेल 19:27

पण त्याने माझ्याशी लबाडी केली. माझ्याविरुद्ध तुझे कान फुंकले पण स्वामी, तुम्ही देवदूतासारखे आहात. आपल्याला योग्य वाटेल ते करा.

यिर्मया 52:33

म्हणून यहोयाकीनने कैद्याचा पोशाख उतरविला उरलेल्या आयुष्यात त्याने नेमाने राजाबरोबर भोजन केले.

Interlinear

Choose Theme