Home Bibles 2 शमुवेल 9:10 · मराठी बायबल
2 शमुवेल 9:10 · मराठी बायबल

त्याची जमीन तू कसायची. तुझी मुले आणि सेवक यांनी एवढे केले पाहिजे. तुम्ही शेतात पीक काढा म्हणजे तुझ्या मालकाच्या नातवाचा त्यावर निर्वाह होईल. पण तो नेहमी माझ्या पंक्तीला जेवेल.”सीबाला पंधरा मुलगे आणि वीस नोकर होते.

Cross references

2 शमुवेल 9:7

त्याला दावीद म्हणाला, “भिऊ नको. माझा तुझ्यावर लोभ आहे. तुझ्या वडीलांसाठी मी एवढे करीन. तुझे आजोबा शौल यांची सर्व जमीन मी तुला परत देईन. माझ्या पंकतीला नेहमी बसण्याचा मान तुला मिळेल.”

2 शमुवेल 9:11

सीबा दावीदाला म्हणाला, “मी तुमचा दास आहे. माझ्या धन्याच्या राजाच्या हुकुमाप्रमाणेच मी वागेन.” तेव्हा मफीबोशेथ दावीदाच्या मुलांप्रमाणेच दावीदाच्या पंक्तीला बसून जेवू लागला.

2 शमुवेल 19:18

राजाच्या कुटुंबियांना उतरुन घ्यायला ते यार्देनच्या पलीकडे गेले. राजाला हवे ते करायला ते तयार होते. राजा नदी ओलांडत असताना गेराचा मुलगा शिमी त्याच्या भेटीला आला. शिमीने राजाला जमिनीपर्यंत लवून अभिवादन केले.

2 शमुवेल 19:28

माझ्या आजोबांच्या घराण्याचा तुम्ही समूळ नाश करू शकला असता पण तसे तुम्ही केले नाही. तुम्ही मला आणखी काही जणाबरोबर आपल्या पंक्तीला बसवलेत. तेव्हा मला काहीही तक्रार करायचा हक्क नाही.”

2 राजे 25:29

अबील मरोदखने त्याला तुरुंगातले कपडे बदलायला लावले. पुढे आयुष्यभर यहोयाखीन अबील मरोदखच्या शेजारी मेजावर बसून जेवत असे.

लूक 14:15

आता जेव्हा मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने हे ऐकले, तेव्हा तो येशूला म्हणाला, “देवाच्या राज्यात जेवतो, तो प्रत्येक जण धन्य!”

Interlinear

Choose Theme