Home Bibles ☰ Books 2 शमुवेल 24:21 · मराठी बायबल
2 शमुवेल 24:21 · मराठी बायबल

अरवना म्हणाला, “माझे स्वामी का बरे आले आहेत?”दावीद म्हणाला, “तुझे खळे विकत घ्यायला. म्हणजे मग मी परमेश्वरा प्रीत्यर्थ इथे एक वेदी बांधीन. मग रोगराई संपुष्टात येईल.”

Cross references

उत्पत्ति 23:8

“तुम्हाला जर माझ्या मयत बायकोला पुरण्यासाठी खरोखर मला मदत करावी असे वाटत असेल तर मग माझ्यातर्फे सोहराचा मुलगा एफ्रर्न याच्याकडे शब्द टाका;

गणना 16:44

परमेश्वर मोशेला म्हणाला,

गणना 25:8

त्याने त्या इस्राएली माणसाचा त्याच्या तंबूपर्यंत पाठलाग केला. नंतर त्याने त्या इस्राएली माणसाला व मिद्यानी स्त्रीला तिच्या मंडपातमारण्यासाठी बरचीचा उपयोग केला. त्याने बरची त्या दोघांच्या शरीरात खुपसली. त्यावेळी इस्राएल लोकांमध्ये खूप मोठा आजार पसरला होता. पण फिनहासने त्या दोघांना मारल्यानंतर त्या आजाराचा प्रसार थांबला.

2 शमुवेल 21:3

दावीद त्यांना म्हणाला, “तुमच्या साठी मी काय करु?“इस्राएलचा कलंक पुसला जाईल आणि तुम्ही या परमेश्वराच्या प्रजेला आशीर्वाद द्याल यासाठी मी काय करु शकतो?”

2 शमुवेल 24:3

पण यवाब राजाला म्हणाल. “आपले लोक कितीही असोत देव परमेश्वर त्यांना शतगुणित करो. तुम्हाला हे सर्व पाहायला मिळो पण तुम्हाला असे का करावेसे वाटते?”

2 शमुवेल 24:18

त्या दिवशी गाद दावीद कडे आला. तो म्हणाला, “अरवना यबूसीच्या खळ्यावर परमेश्वराप्रीत्यर्थ एक वेदी बांध”

1 इतिहास 21:22

राजा त्याला म्हणाला, “तुझे हे खळे मला विकत दे. त्याची पूर्ण किंमत मी तुला देईन. तेथे मला परमेश्वराच्या उपासने करिता वेदी बांधायची आहे. म्हणजे ही जीवघेणी मरी थांबेल.”

स्तोत्रसंहिता 106:30

पण फीनहासने देवाची प्रार्थना केलीआणि देवाने आजार थांबवला.

यिर्मया 32:6

यिर्मया कैदेत असताना म्हणाला, “मला परमेश्वराचा संदेश मिळाला आहे. तो पुढीलप्रमाणे आहे.

Interlinear

Choose Theme