Home Bibles 1 इतिहास 21:22 · मराठी बायबल
1 इतिहास 21:22 · मराठी बायबल

राजा त्याला म्हणाला, “तुझे हे खळे मला विकत दे. त्याची पूर्ण किंमत मी तुला देईन. तेथे मला परमेश्वराच्या उपासने करिता वेदी बांधायची आहे. म्हणजे ही जीवघेणी मरी थांबेल.”

Cross references

उत्पत्ति 23:9

त्याच्या मालकीच्या शेताच्या एका टोकाला असलेली मकपेला येथील गुहा विकत घेणे मला आवडेल; मी तिची पुरेपूर किंमत त्याला देतो, व ती माझ्या मालकीची स्मशानभुमि म्हणून विकत घेतो; त्या बद्दल तुम्ही सर्वजण साक्षी असावे.”

गणना 25:8

त्याने त्या इस्राएली माणसाचा त्याच्या तंबूपर्यंत पाठलाग केला. नंतर त्याने त्या इस्राएली माणसाला व मिद्यानी स्त्रीला तिच्या मंडपातमारण्यासाठी बरचीचा उपयोग केला. त्याने बरची त्या दोघांच्या शरीरात खुपसली. त्यावेळी इस्राएल लोकांमध्ये खूप मोठा आजार पसरला होता. पण फिनहासने त्या दोघांना मारल्यानंतर त्या आजाराचा प्रसार थांबला.

2 शमुवेल 24:21

अरवना म्हणाला, “माझे स्वामी का बरे आले आहेत?”दावीद म्हणाला, “तुझे खळे विकत घ्यायला. म्हणजे मग मी परमेश्वरा प्रीत्यर्थ इथे एक वेदी बांधीन. मग रोगराई संपुष्टात येईल.”

1 राजे 21:2

एकदा अहाब नाबोथला म्हणाला, “तुझा मळा मला दे. तिथे मला भाजीचा मळा करायचा आहे. तुझा मळा माझ्या महालाला लागूनच आहे. त्याच्या ऐवजी मी तुला आणखी चांगला द्राक्षमळा देईन. किंवा तुला हवे असेल तर याचा मोबदला मी पैशात देईन.”

Interlinear

Choose Theme