पण यवाब राजाला म्हणाल. “आपले लोक कितीही असोत देव परमेश्वर त्यांना शतगुणित करो. तुम्हाला हे सर्व पाहायला मिळो पण तुम्हाला असे का करावेसे वाटते?”
Cross references
तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्या कृपेने ती आणखी वाढून आत्ताच्या हजारपट होवो आणि त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळो.
हिंमत बाळग आपल्या लोकांसाठी, देवाच्या नगरांसाठी आपण पराक्रमाची शिकस्त करु. परमेश्वर त्याला योग्य वाटेल तसे करील.”
यावर यवाब म्हणाला, “परमेश्वर आपले राष्ट्र आहे त्यापेक्षा शंभर पटीने वाढवो. इस्राएलमधील सर्व लोक आपले दास आहेत, तेव्हा माझे स्वामीराज, आपण ही गोष्ट कशासाठी करता? त्याने इस्राएलचे लोक दोषी आणि पातकी ठरतील.”
परमेश्वर तुला आणि तुझ्या मुलांना अधिकाधिक आशीर्वाद देईल. अशी मी आशा करतो.
जर राजा खूप लोकांवर राज्य करत असला तर तो महान असतो. पण जर तिथे लोकच नसले तर त्या राजाची काहीच किंमत नसते.
हे भविष्यात घडून येईल. त्यावेळी तू तुझ्या लोकांना पाहशील. तुझा चेहरा मग आनंदाने उजळेल. प्रथम तू घाबरशील. पण नंतर तुझ्या भावना अनावर होतील. समुद्रापलीकडील सर्व संपत्ती तुझ्यापुढे ठेवली जाईल. राष्ट्रांचे सर्व धन तुला मिळेल.