Home Bibles 2 शमुवेल 21:7 · मराठी बायबल
2 शमुवेल 21:7 · मराठी बायबल

पण योनाथानचा मुलगा मफीबोशेथ याला राजाने अभय दिले. योनाथान हा शौलचा मुलगा. पण दावीदाने त्याला त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचे वचन दिले होते. म्हणून मफीबोशेथला राजाने इजा पोचू दिली नाही.

Cross references

1 शमुवेल 18:3

योनाथानचे दावीदवर अपार प्रेम होते. त्याने दावीदशी एक करार केला.

1 शमुवेल 20:8

योनाथान, माझ्यावर कृपा कर. मी तुझा दास आहे. परमेश्वराच्या साक्षीने तू माझ्याशी करार केला आहेस. मी अपराधी आढळल्यास खुशाल तू माझा वध कर. पण मला तुझ्या वडीलांकडे नेऊ नको.”

1 शमुवेल 20:15

माझ्या कुटुंबावरील तुझ्या लोभात खंड न पडो. परमेश्वर तुझ्या वैऱ्यांचा पृथ्वीतलावरुन नि:पात करील.

1 शमुवेल 20:17

योनाथानने मग दावीदला परस्परांवरील प्रेमाच्या आणाभाका परत घ्यायला लावल्या. दावीदावर त्याचे स्वत: इतकेच प्रेम होते म्हणून त्या प्रेमापोटी त्याने असे केले.

1 शमुवेल 20:42

योनाथान दावीदला म्हणाला, “शांत चित्ताने जा. परमेश्वराची शपथ घेऊन आपण मैत्रीच्या आणाशपथा घेतल्या आहेत. आपण आणि आपले वंशज यांना परमेश्वर, चिरंतन साक्षी आहे.”

1 शमुवेल 23:18

मग त्या दोघांनी परमेश्वरासमोर करार केला. तिथून योनाथान आपल्या घरी गेला. दावीद होरेश येथेच राहिला

1 शमुवेल 24:22

तेव्हा दावीदाने त्याला तसे वचन दिले. शौलच्या कुटुंबाचा संहार न करण्याचे कबूल केले. तेव्हा शौल घरी परतला. दावीद आणि त्याची माणसे गडावर परतली.

2 शमुवेल 4:4

शौलाचा मुलगा योनाथान याला मफीबोशेथ नावाचा मुलगा होता. इज्रेलहून शौल आणि योनाथान यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा हा मफीबोशेथ पाच वर्षांचा होता. शत्रूच्या भीतीने त्याची दाई त्याला घेऊन पळाली. पळापळीत तिच्या हातून तो खाली पडला आणि दोन्ही पायांनी अधू झाला.

2 शमुवेल 9:1

दावीदाने विचारले, “शौलाच्या घराण्यातील कोणी व्यक्ती अजून राहिली आहे का? योनाथानसाठी मला तिच्यावर दया दाखवली पाहिजे”

2 शमुवेल 9:6

योनाथानच्या मुलगा मफीबोशेथ आला आणि राजापुढे नतमस्तक होऊन उभा राहिला, “मफीबोशेथ?” राजाने विचारले.मफीबोशेथ म्हणाला, “होय, मीच तुमचा सेवक मफीबोशेथ.’

2 शमुवेल 9:7

त्याला दावीद म्हणाला, “भिऊ नको. माझा तुझ्यावर लोभ आहे. तुझ्या वडीलांसाठी मी एवढे करीन. तुझे आजोबा शौल यांची सर्व जमीन मी तुला परत देईन. माझ्या पंकतीला नेहमी बसण्याचा मान तुला मिळेल.”

2 शमुवेल 9:10

त्याची जमीन तू कसायची. तुझी मुले आणि सेवक यांनी एवढे केले पाहिजे. तुम्ही शेतात पीक काढा म्हणजे तुझ्या मालकाच्या नातवाचा त्यावर निर्वाह होईल. पण तो नेहमी माझ्या पंक्तीला जेवेल.”सीबाला पंधरा मुलगे आणि वीस नोकर होते.

2 शमुवेल 16:4

तेव्हा राजा सीबाला म्हणाला, “ठीक आहे, जे जे मफिबोशेथच्या मालकीचे होते ते मी आता तुला देत आहे.”सीबा म्हणाला, “मी आपल्या पाया पडतो. मी तुम्हाला आनंद देण्यास समर्थ होईन अशी मी आशा करतो.”

2 शमुवेल 19:25

मफीबोशेथ यरुशलेमहून आला तेव्हा राजा त्याला म्हणाला, “मी तेथून निघालो तेव्हा तूही माझ्याबरोबर का बाहेर पडला नाहीस?”

Interlinear

Choose Theme