तेव्हा राजा सीबाला म्हणाला, “ठीक आहे, जे जे मफिबोशेथच्या मालकीचे होते ते मी आता तुला देत आहे.”सीबा म्हणाला, “मी आपल्या पाया पडतो. मी तुम्हाला आनंद देण्यास समर्थ होईन अशी मी आशा करतो.”
Cross references
“एखादा अपराधी माणूस, खोटी साक्ष देण्याकरता तुम्हाला लाच देण्याचा प्रयत्न करील, तर ती तुम्ही मुळीच घेऊ नये; लाच घेतल्यामुळे न्यायाधीश आंधळे बनतात; त्यांना सत्य दिसत नाही आणि अशा लाचलूचपतीमुळे चांगले सज्जन लोकही खोटे बोलू लागतात.
तो तुमच्यासाठी संदेष्ट्याला पाठवील. तुमच्यामधूनच तो उदयाला येईल. तो माझ्यासारखा असेल. त्याचे तुम्ही ऐका.
दावीदाने मग शौलचा सेवक सीबा याला बोलवले. त्याला तो म्हणाला, “शौलाच्या मालकीचे जे जे काही आहे ते मी या तुझ्या मालकांच्या नातवाला, मफीबोशेथला दिले आहे.
मग तकोवा येथील बाई राजाशी बोलली. तिने स्वत:ला जमिनीवर लवून व राजापुढे नतमस्तक होऊन ती म्हणाली, “कृपाकरून मला मदत करा.”
हे ऐकून राजा तिला म्हणाला, “मी यात लक्ष घालतो. तू घरी जा.”
राजा दावीद म्हणाला, “तुझ्याविरुद्ध कोणी काही बोलले तर त्याला माझ्याकडे आण तुला पुन्हा कोणी त्रास देणार नाही.”
यवाबाने राजाला वाकून अभिवादन केले. राजाचे अभीष्ट चिंतून तो म्हणाला, “तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात हे मी जाणतो. माझी विनंती तुम्ही मान्य केलीत यावरून मी ताडले.”
तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी इतरांना त्यांचे बोलणे संपवू द्या. त्यामुळे तुम्ही गोंधळणार नाही आणि मूर्खही ठरणार नाही.
सुरुवातीला बोलणारा माणूस नेहमी बरोबर आहे असे तोपर्यंत वाटत असते, जोपर्यंत कुणीतरी येऊन त्याला प्रश्र विचारीत नाही.
काही गोष्टींविषयी खूप उत्साह दाखविणे एवढेच पुरेसे नसते. तुम्ही काय करीत आहात ते तुम्हाला कळले पाहिजे. एखादी गोष्ट करण्यासाठी एकदम् पुढे घुसू नये, नाही तर तुम्ही ती चुकीची कराल.