इस्राएलांच्या सर्व वंशांमधून जात शबा आबेल व बेथ माका येथे गेला. सर्व बेरीही एकत्र येऊन शबाला मिळाले.
Cross references
इस्राएल लोकांनी तो प्रदेश सोडला व ते बएरयेथे गेले. ही जागा विहिरीने युकत होती. या ठिकाणी परमेश्वराने मोशेला सांगितले, “इथे लोकांना एकत्र आण. व मी त्यांना इथे पाणी देईन.”
गिबोन, रामा, बैरोथ.
राजा बेनहदाद याने आसाशी करार केला आणि इयोन, दान, आबेल - बेथ माका, गालिल सरेवरालगतची गावे आणि नफतालीचा प्रांत यांच्यावर चढाई करायला आपले सैन्य पाठवले.
अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर हा इस्राएलवर चाल करुन आला. पेकह इस्राएलचा राजा होता तेव्हा हे घडले. तिग्लथ-पिलेसरने इयोन, आबेल, बेथ माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद, गालील आणि सर्व नफताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकांना कैद करुन अश्शूरला नेले.
बने - हदाद या गोष्टीशी सहमत झाला. त्याने इस्राएली नगरांवर आपले सैन्याचे सरदार पाठवले. त्या सरदारांनी ईयोन, दान आबेल मईम या नगरांवर हल्ला केला. कोठारे असलेल्या नफतालीच्या नगरांवरही त्यांनी चढाई केली.