अमासाचा देह तिथून हलवल्यावर लोक ते सरळ ओलांडून यवाबाच्या मागे चालू लागले. मग त्यांनी यवाबाबरोबर शबाचा पाठलाग सुरु केला.
Cross references
इस्राएल लोकांनी उत्तर दिले, “आम्ही मुख्य रस्त्यावरुन जाऊ. जर आमची जनावरे तुमचे पाणी प्यायले तर आम्ही तुम्हाला त्याचा मोबदला देऊ. आम्हाला फकत तुमच्या देशातून जायचे आहे. आम्हाला तो प्रदेश आमच्यासाठी घ्यायची इच्छा नाही.”
यातून एक मार्ग आहे. शिलो नगरात दरवर्षी परमेश्वराचा उत्सव असतो. तो आता आलाच आहे.” (शिलो हे नगर बेथेलच्या उत्तरेला, बेथेलहून शखेमकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पूर्वेला आणि लबोनाच्या दक्षिणेला वसलेले आहे.)
गाई सरळ बेथशेमेश कडे निघाल्या. त्या हंबरत चालल्या होत्या व मुख्य रस्ता सोडून इकडे तिकडे वळल्या नाहीत. बेथशेमेशच्या हद्दीपर्यंत पलिष्ट्यांचे अधिकारी गाईच्या मागोमाग होते.
अमासा रस्त्याच्या मध्याभागी सक्ताच्या थारोळ्यात पडला होता. येणारा जाणारा प्रत्येकजण थांबून हे दृष्य पाहतोय हे त्या तरुण सैनिकाच्या लक्षात आले. तेव्हा त्याने ते प्रेत रस्त्यावरुन ढकलत शेतात नेऊन टाकले. त्याच्यावर एक कापड अंथरले.
अश्शूरच्या राजाने मोठ्या सैन्यासोबत आपले तीन महत्वाचे सेनापती यरुशलेममध्ये राजा हिज्कीयाकडे पाठवले. तेव्हा ते लाखीश येथून यरुशलेमला निघाले. वरच्या तलावाच्या पाटापाशी ते उभे राहिले. (परिटाच्या शेताकडे जो रस्ता जातो त्या वाटेवर हा वरचा तलाव आहे)
चांगले लोक वाईटापासून दूर राहाण्याचा प्रयत्न करीत आपले आयुष्य जगतात. जो माणूस जीवनात काळजी घेतो तो आपल्या आत्म्याचे रक्षण करतो.
तेव्हा परमेश्वर यशयाला म्हणाला, “धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेथे वरच्या डोहाला पाणी मिळते तेथे तू व तुझा मुलगा शआर-याशूब असे दोघे आहाजला भेटा व त्याच्याशी बोला.
सन्हेरीबने आपल्या सेनापतीला यरूशलेमवर स्वारी करण्यासाठी पाठविले. सेनापती लाखीशहून निघाला आणि यरूशलेममध्ये हिज्कीया राजाकडे गेला. त्याने आपले शक्तिशाली सैन्य बरोबर घेतले होते. परटाच्या शेताजवळच्या रस्त्याकडे ते गेले हा रस्ता वरच्या डोहातून पाणी वाहून आणणाऱ्या चराजवळ होता.
दरवाजातून आत या लोकांसाठी रस्ता मोकळा करा. रस्ता तयार करा. रस्त्यावरील दगड बाजूला काढा. लोकांकरिता निशाणी म्हणून ध्वज उंच उभारा.
“इस्राएलच्या लोकानो, रस्त्यांवर खुणांचे फलक लावा. घराकडे जाणाऱ्या वाटेवर खूण करा. वाटेवर लक्ष ठेवा. तुम्ही ज्या रस्त्यावरुन जात आहात. त्याचे स्मरण ठेवा. इस्राएल माझ्या पत्नी, घरी ये. तुझ्या गावांना परत ये.
मग ते यरीहोस आले. येशू आपले शिष्य व लोकसमुदायासह यरीहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तीमय हा एक आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता.