Home Bibles गणना 21:16 · मराठी बायबल
गणना 21:16 · मराठी बायबल

इस्राएल लोकांनी तो प्रदेश सोडला व ते बएरयेथे गेले. ही जागा विहिरीने युकत होती. या ठिकाणी परमेश्वराने मोशेला सांगितले, “इथे लोकांना एकत्र आण. व मी त्यांना इथे पाणी देईन.”

Cross references

निर्गम 17:6

होरेब डोंगरावरील एका खडकावर म्हणजे सिनाय डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन, त्या खडकावर ती आपट म्हणजे त्या खडकातून पाणी बाहेर येईल. मग लोकांनी ते प्यावे.”मोशेने हे सर्व केले आणि इस्राएल लोकांच्या वडिलधाऱ्या माणसांनी म्हणजे पुढाऱ्यांनी ते पाहिले.

गणना 20:8

“चालण्याची खास काठी घे. तुझा भाऊ अहरोन याला आणि त्या लोकांना बरोबर घे आणि खडकाजवळ जा. लोकांसमोर खडकाशी बोल. नंतर त्या खडकातून पाणी वाहू लागेल आणि तू ते पाणी त्या लोकांना आणि त्यांच्या जनावरांना देऊ शकशील.

शास्ते 9:21

एवढे बोलून योथाम बैर या शहराला पळून गेला. अबीमलेखाच्या भीतीने तो तेथेच राहिला.

यशया 12:3

तारणाच्या झऱ्यातून तुम्ही पाणी घ्या म्हणजे सुखी व्हाल आणि म्हणाल, “परमेश्वराची स्तुती असो. त्याच्या नावाची उपासना करा. त्याच्या करणीची माहिती लोकांना सांगा.”

यशया 15:8

मवाबमध्ये सगळीकडे रडणे ऐकू येत आहे. लांब असलेल्या एग्लाइममधील लोक रडत आहेत आणि बैर-एलिममध्येही आक्रोश सुरू आहे.

यशया 41:17

“गरीब आणि गरजू पाण्याचा शोध घेतात. पण त्यांना पाणी मिळू शकत नाही. ते तहानेलेले आहेत. त्यांच्या तोंडाला कोरड पडली आहे. मी त्यांनी केलेली आळवणी ऐकेन. मी इस्राएलचा देव, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

यशया 43:20

हिंस्र पशुसुध्दा माझे आभार मानतील. मोठे प्राणी आणि पक्षी मला मान देतील. मी जेव्हा वाळवंटात पाणी आणि कोरड्या जमिनीवर नद्या निर्माण करीन तेव्हा ते माझा आदर करतील. मी निवडलेल्या. माझ्या लोकांना पाणी मिळावे म्हणून मी हे करीन.

यशया 49:10

लोक उपाशी राहणार नाहीत. ते तहानेलेही राहणार नाहीत. तळपणारा सूर्य आणि उष्ण वारे त्यांना इजा करणार नाहीत. का? कारण देव त्यांचे दु:ख हलके करील आणि त्यांना घेऊन जाईल तो त्यांना पाण्याच्या झऱ्याजवळ घेऊन जाईल.

योहान 4:10

येशूने उत्तर दिले, “देव काय दान देतो याविषयी तुला माहीत नाही आणि तुझ्या हातून पाणि मागणारा कोण हे देखील तुला माहीत नाही. तुला जर या गोष्टी माहीत असत्या तर तूच माझ्याकडे मागितले असतेस. आणि मी तुला जिवंत पाणी दिले असते.”

योहान 4:14

परंतु मी जे पाणी देतो ते पाणी जो पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. मी दिलेले पाणी त्याच्या अंतर्यामी जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे होईल. त्या पाण्यामुळे त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल.”

योहान 7:37

सणाचा शेवटचा दिवस आला. तो फार महत्वाचा दिवस होता. त्या दिवशी उभे राहून येशू मोठयाने म्हणाला, “ज्याला तहान लागली असेल त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.

प्रकटीकरण 21:6

नंतर तो मला म्हणाला, “पूर्ण झाले आहे! मी अल्फा व ओमेगा, आरंभ व शेवट आहे. जो कोणी तहानेला आहे, त्यालामी जीवनी पाण्याच्या झऱ्यातील पाणी फुकट देईन.

प्रकटीकरण 22:1

नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी स्फटिकासारखी स्पष्ट होती. ती नदी देवाच्याआणि कोकऱ्यांच्या राजासनापासून उगम पावत होती.

प्रकटीकरण 22:17

आत्मा आणि नवरी असे म्हणतात की,“ये! आणि जो कोणी हे ऐकतो, तो असे म्हणो की, “ये!” आणि जो तहानेला आहे, तो येवो, ज्या कोणाला पाहिजे, तोफुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो.

Interlinear

Choose Theme