यवाबाच्या सैन्यातील एक तरुण सैनिक अमासाच्या मृतदेहाजवळ उभा राहिला आणि म्हणाला, “यवाब आणि दावीदाला ज्यांचा पाठिंबा आहे त्यांनी यवाबामागे जावे.”
Cross references
राजा अमासाला म्हणाला, “यहूदाच्या लोकांना तीन दिवसात येऊन मला भेटायला सांग. त्यावेळी तूही बरोबर राहा.”
दावीद अबीशयला म्हणाला, “अबशालोमपेक्षाही हा बिक्रीचा मुलगा शबा आपल्या दृष्टीने धोकादायक आहे. तेव्हा माझ्या हाताखालच्यांना घेऊन त्याचा पाठलाग कर. तटबंदी असलेल्या नगरात तो जायच्या आधीच त्याला गाठायला हवे. एकदा तो मजबूत बंदोबस्त असलेल्या नगरात शिरला की त्याला पकडणे अवघड जाईल.”
अमासाचा देह तिथून हलवल्यावर लोक ते सरळ ओलांडून यवाबाच्या मागे चालू लागले. मग त्यांनी यवाबाबरोबर शबाचा पाठलाग सुरु केला.
पण एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शबा नावाचा एक माणूस तुमच्या नगरात आहे. दावीद राजाविरुध्द त्याने बंड केले आहे. त्याला माझ्यापुढे हजर केलेत तर नगराला धक्कालावणार नाही.”तेव्हा ती बाई यवाबाला म्हणाली, “ठीक आहे. त्याचे मुंडके भिंतीवरुन तुझ्याकडे टाकण्यात येईल.”
येहूने वर खिडकीकडे पाहात म्हटले, “माझ्या बाजूने कोण आहे? बोला!”तेव्हा खिडकीतून दोन तीन खोजांनी त्याच्याकडे पाहिले.