दावीद अबीशयला म्हणाला, “अबशालोमपेक्षाही हा बिक्रीचा मुलगा शबा आपल्या दृष्टीने धोकादायक आहे. तेव्हा माझ्या हाताखालच्यांना घेऊन त्याचा पाठलाग कर. तटबंदी असलेल्या नगरात तो जायच्या आधीच त्याला गाठायला हवे. एकदा तो मजबूत बंदोबस्त असलेल्या नगरात शिरला की त्याला पकडणे अवघड जाईल.”
Cross references
दावीद हित्ती, अहीमलेख, आणि सरुवेचा मुलगा अहीशय यांच्याशी बोलला. (अबीशय हा यवाबचा भाऊ). या दोघांना दावीदाने विचारले, “माझ्याबरोबर शौलच्या तळावर यायला कोण तयार आहे”अबीशय म्हणाला, “मी येतो.”
यवाब, अबीशय आणि असाएल हे सरूवेचे तीन पुत्र. त्यापैकी असाएल हा वेगवान धावपटू होता. अगदी रानातल्या हरणासारखा चपळ होता.
गिबोनच्या लढाईत अबनेरने असाएलला मारले. आपल्या भावाच्या वधाचे प्रत्युत्तर म्हणून यवाब आणि अबीशय यांनी अबनेरला मारले.
त्याच दिवशी राजा म्हणून माझा राज्याभिषेक झाला. सरुवेच्या मुलांचे हे वर्तन मला फार त्रासदायक झाले आहे. परमेश्वर त्यांच्या गुन्ह्याबद्दल त्यांना तसेच शासन करो.”
अम्मोन्यांनी पुढून तसेच मागून आपल्याला घेरले आहे हे यवाबाने पाहिले. तेव्हा त्याने इस्राएलातील उत्तम योध्द्यांची निवड केली. त्यांना अराम्यांच्या विरुद्ध लढायला सज्ज केले.
अराम्यांनी पलायन केलेले पाहताच अम्मोनीही अबीशय समोरुन पळून गेले आणि आपल्या नगरात परतले. अम्मोन्यांबरोबरच्या या लढाई नंतर यवाब यरुशलेमला परतला.
उरीया दावीदाला म्हणाला, “पवित्र करारकोश, इस्राएलचे सैनिक आणि यहूदा हे राहूट्यांमध्ये राहात आहेत. माझा धनी यवाब आणि महाराजांचे (दावीदाचे) सेवक ही खुल्या मैदानात तळ देऊन आहेत. अशा वेळी मीच तेवढे घरी जाऊन खाणे-पिणे, बायकोच्या सहवासात झोपणे योग्य होणार नाही.”
सर्वांची त्याने तीन गटात विभागणी केली. यवाब, अबीशय (यवाबाचा भाऊ आणि सरुवेचा मुलगा) आणि गथ येथील इत्तय या तिघांना एकेक गटाचे प्रमुख म्हणून नेमले आणि सर्वांची रवानगी केली. तेव्हा राजा दावीद त्यांना म्हणाला, “मी ही तुमच्याबरोबर येतो.”
तो माणूस म्हणाला, “तुम्ही हजार रौप्यमुद्रा देऊ केल्या असत्या तरी मी राजकुमाराला इजा पोचू दिली नसती. कारण तुम्ही, अबीशय आणि इत्तय यांना राजाने केलेला हुकूम आम्ही ऐकला आहे. राजा म्हणाला होता, “लहान अबशालोमला घातपात होणार नाही याची काळजी घ्या.’
आता ऊठ आणि आपल्या सेवकांशी बोल. त्यांना प्रोत्साहन दे. आत्ताच उठून तू हे ताबडतोब केले नाहीस तर आज रात्रीपर्यंत तुझ्या बाजूला एकही माणूस उरणार नाही याची मी परमेश्वरासमक्ष ग्वाही देतो आणि हा तुझ्या बालपणापासूनच्या आयुष्यातला सर्वात मोठा आघात असेल.”
पण सरुवेचा मुलगा अबीशय याने या पलिष्ट्याला मारले आणि दावीदाचे प्राण वाचवले.तेव्हा दावीद बरोबरच्या लोकांनी दावीदाला शपथ घालून सांगितले “तुम्ही आता लढाईवर यायचे नाही. नाहीतर इस्राएल एका मोठ्या नेत्याला मुकेल.”
सरूवेचा मुलगा यवाब याचा भाऊ म्हणजे अबीशय. अबीशय या तीन वीरांचा नायक होता. आपल्या भाल्याने त्याने तीनशे शत्रू सैनिकांना ठार केले. आणि त्या तिघांमध्ये नाव मिळवले.
राजा त्यांना म्हणाला, “माझ्या अधिकाऱ्यांना सोबत घ्या. माझा पुत्र शलमोन याला माझ्या स्वत:च्या खेचरावर बसवून गीहोन झऱ्याकडे जा.
यवाबचा भाऊ अबीशय हा या तिघांचा प्रमुख होता. त्याने आपल्या भाल्याने तीनशे जणांचा प्रतिकार केला आणि त्यांना ठार केले. अबीशय त्या तिघांएवढाच प्रसिध्द होता.
सरुवेचा मुलगा अबीशाय याने क्षार खोऱ्यात अठरा हजार अदोमी लोकांना मारले.
जर राज्यातच फूट पडली तर ते राज्य टिकू शकत नाही.