दावीद महनाइम येथे आला. शोबी, माखीर आणि बिर्जिल्ल्य तेथेच होते. (नाहाशचा मुलगा शोबी हा अम्मोन्यांच्या राब्बा नगरातला होता. अम्मीएलचा मुलगा माखीर हा लो-दबार तर बर्जिल्ल्य गिलादमधील रोगलीमचा होता)
Cross references
साधारण महिन्याभरानंतर अम्मोनी राजा नाहाश याने आपल्या सैन्यासह याबोश गिलादला वेढा दिला. तेव्हा याबेशाच्या लोकांनी नाहाशला निरोप पाठवला की तू आमच्याशी करार केल्यास तुझ्या आधिपत्याखाली आम्ही राहू.
तेव्हा दावीदाने सीबाला त्याचा ठावठिकाणा विचारला. सीबाने सांगितले, “तो लो-दबार येथे, अम्मीएलचा मुलगा माखीर याच्या घरी आहे.”
पुढे अम्मोन्यांचा राजा नाहाश मरण पावला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा हानून राज्यावर आला.
अम्मोन्यांच्या राब्बावर हल्ला करुन यवाबाने हे राजधानीचे नगर काबीज केले.
दावीद मग सर्व लोकांना घेऊन राब्बाकडे गेला. राब्बा येथे लढाई करुन त्याने त्याचा ताबा घेतला.
गिलादचा बर्जिल्ल्य रोगलीमहून आला. दावीदाला तो यार्देन नदीच्या पलीकडे पोचवायला आला.
बर्जिल्ल्यचे वय झाले होते. तो ऐंशी वर्षांचा होता. राजा दावीदाचा मुक्काम महनाईम येथे असताना त्याने दावीदाला अन्नधान्य आणि इतर गोष्टी पुरवल्या होत्या. श्रीमंत असल्यामुळे तो एवढे करु शकला.
दावीद त्याला म्हणाला, “नदी उतरुन माझ्याबरोबर चल. तू युरुशलेममध्ये माझ्याबरोबर राहिलास तर मी तुझा सांभाळ करीन.”
“गिलादच्या बर्जिल्ल्य याच्या मुलांवर लोभ असू दे. त्यांच्याशी सख्य ठेव आणि तुझ्या पंगतीला त्यांना बसू दे. तुझा भाऊ अबशलोम याच्यापासून मी पळ काढला तेव्हा त्यांनीच मला मदत केली.
याजकांच्या घरण्यातील हबया, हक्कोस, बर्जिल्लय, (गिलादच्या बर्जिल्लयच्या मुलीशी जो लग्न करेल तो बर्जिल्ल्यचा वंशज मानला जातो) यांचे वंशज.