Home Bibles 1 शमुवेल 11:1 · मराठी बायबल
1 शमुवेल 11:1 · मराठी बायबल

साधारण महिन्याभरानंतर अम्मोनी राजा नाहाश याने आपल्या सैन्यासह याबोश गिलादला वेढा दिला. तेव्हा याबेशाच्या लोकांनी नाहाशला निरोप पाठवला की तू आमच्याशी करार केल्यास तुझ्या आधिपत्याखाली आम्ही राहू.

Cross references

उत्पत्ति 26:28

त्यांनी उत्तर दिले, “परमेश्वर तुझ्याबरोबर आहे हे आम्हाला आता पूर्णपणे समजले आहे; आम्हाला असे वाटते की आपण आता आपल्यामध्ये एक करार करावा; तू आम्हाला वचन द्यावे अशी आमची इच्छा आहे;

निर्गम 23:32

तुम्ही त्या लोकांच्या बरोबर किंवा त्यांच्या दैवतांबरोबर कोणताही करार करु नये.

अनुवाद 23:3

“अम्मोनी आणि मवाबी यांनी व त्यांच्या पुढच्या दहा पिढ्यांनीही इस्राएलांबरोबर उपासनेत सामील होवू नये.

शास्ते 10:7

तेव्हा परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. त्याने अम्मोनी आणि पलिष्टी या लोकांच्या हातून त्यांचा पराभव करवला.

शास्ते 11:4

काही काळानंतर अम्मोनी लोकांची इस्राएल लोकांबरोबर लढाई झाली.

शास्ते 11:8

त्यावर ही वडीलधारी मंडळी म्हणाली, “अडचण आहे म्हणून तर आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. आता कृपा करुन अम्मोन्यांच्या विरुद्ध उठाव करायला आमच्या बरोबर चल. गिलादातील सर्वांचा तू सेनापती होशील.”

शास्ते 21:8

पुढे ते म्हणाले, “मिस्पा येथे आज इस्राएलाच्या कोणत्या वंशाची गैरहजेरी आहे? येथे जमलेल्यात एक कोणीतरी दिसत नाहीत एवढे खरे!” मग त्यांच्या लक्षात आले की याबेश-गिलाद या शहरातून कोणीही आलेले नाही.

शास्ते 21:10

आणि इस्राएल लोकांनी बाराहजारांचे सैन्य याबेश-गिलादवर पाठवले. त्यांनी सैन्याला हुकूम केला, “तेथे जा आणि प्रत्येकाला तलवारीने कापून काढा अगदी बायका मुलांना सुध्दा सोडू नका.

1 शमुवेल 12:12

पण मग अम्मोन्यांचा राजा नाहाश याला तुमच्यावर चाल करुन येताना तुम्ही पाहिले आणि तुम्हाला संरक्षणासाठी राजा असाव असे वाटले. प्रत्यक्ष परमेश्वर तुमचा देव राजा असतानाही तुम्हाला असे वाटले.

1 शमुवेल 31:11

पलिष्ट्यांनी शौलची काय गत केली ते याबेश-गिलाद येथील रहिवाश्यांनी ऐकले.

2 शमुवेल 2:5

तेव्हा दावीदाने याबेश गिलादच्या लोकांकडे दूत पाठवून संदेश दिला, “आपला स्वामी शौल याचा दफनविथी करुन तुम्ही जो दयाभाव दाखवला आहे त्याबद्दल परमेश्वर तुमचे भले करो.

2 शमुवेल 10:1

पुढे अम्मोन्यांचा राजा नाहाश मरण पावला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा हानून राज्यावर आला.

2 शमुवेल 10:2

दावीदाने विचार केला, “नाहाशचा माझ्यावर लोभ होता तेव्हा त्याचा मुलगा हानून याच्याशी मी सौजन्याने वागेन.” दावीदाने मग हानूनला पितृशोक झाला म्हणून त्याच्या सांत्वनासाठी आपल्या सेवकांना पाठवले.तेव्हा ते सेवक अम्मोन्यांच्या प्रांतात आले.

1 राजे 20:34

बेनहदाद अहाबला म्हणाला, “माझ्या वडीलांनी तुझ्या वडीलांकडून जी गावे घेतली ती मी तुला परत करीन. मग, माझ्या वडीलांनी शोमरोन मध्ये बाजारपेठा वसवल्या तशा तुला दिमिष्कात करता येतील”अहाब त्यावर म्हणाला, “या कारावर ती तुला मुक्त करायला तयार आहे.” तेव्हा या दोन राजांनी आपसात शांतिचा करार केला. मग राजा अहाबने राजा बेन-हदादला मुक्त केले.

1 इतिहास 10:11

पलिष्ट्यांच्या या कृत्याची वार्ता याबेश गिलाद नगरातील लोकांच्या कानावर गेली.

1 इतिहास 10:12

तेव्हा त्यांच्यातील शूर माणसे शौल आणि त्याची मुले यांचे मृतदेह आणायला निघाली. ते मृतदेह त्यांनी याबेश गिलाद येथे आणले. तेथे एका मोठ्या वृक्षाखाली त्यांनी त्यांच्या अस्थी पुरल्या आणि सात दिवस उपवास केला.

ईयोब 41:4

ईयोब, लिव्याथान तुझ्याशी करार करुन जन्मभर तुझा दास होऊन राहील का?

यशया 36:16

हिज्कीयाचे हे म्हणणे ऐकू नका. अश्शूरच्या राजाचे म्हणणे ऐका. अश्शूरचा राजा म्हणतो, “आपण एक करार करू तुम्ही शहराबाहेर माझ्याकडे यावे. नंतर प्रत्येकाला घरी जाण्यास मोकळीक मिळेल. प्रत्येकाला आपापल्या द्राक्षवेलींची द्राक्षे व आपापल्या अंजिराच्या झाडाची अंजिरे खाण्यास मुभा मिळे. प्रत्येकाला स्वत:च्या विहिरीचे पाणी पिता येईल.

यहेज्केल 17:13

मग नबुखद्नेस्सरने राजघराण्यातील एका माणसाबरोबर करार केला. त्याने त्याच्याकडून सक्तीने वचन घेतले. त्या माणसाने नबुखद्नेस्सराशी निष्ठेन राहण्याचे वचन दिले. नबुखद्नेस्सरने मग त्याला यहूदाचा नवा राजा केला. मग त्याने यहूदातील सर्व सामर्थ्यवान पुरुषांना यहूदापासून दूर नेले.

Interlinear

Choose Theme