Home Bibles 2 शमुवेल 17:16 · मराठी बायबल
2 शमुवेल 17:16 · मराठी बायबल

“आता त्वरा करा ताबडतोब दावीद कडे निरोप जाऊ द्या. नदीच्या उताराजवळ राहू नका असे त्यांना सांगा. ताबडतोब यार्देन नदी ओलांडून जायला सांगा म्हणजे ते आणि त्यांच्या बरोबरची माणसे पकडली जाणार नाहीत.”

Cross references

1 शमुवेल 20:38

ग तो म्हणाला, “जा धावत जा, लौकर आणि नुसता उभा राहू नको.” मुलाने मग बाण उचलून गोळा करुन आणले.

2 शमुवेल 15:14

तेव्हा यरुशलेममध्ये आपल्या भोवती असलेल्या सर्व सेवकांना दावीद म्हणाला, “आता आपण पळ काढला पाहिजे. आपण येथून निसटलो नाही तर अबशालोमच्या तावडीत सापडू. त्याने पकडायच्या आतच आपण तातडीने निधून जाऊ. नाही तर तो आपल्यापैकी कोणालाही शिल्लक ठेवणार नाही. यरुशलेमच्या लोकांना तो मारून टाकेल.”

2 शमुवेल 15:28

हा प्रदेश ओलांडून वाळवंट लागते त्याठिकाणी मी तुझा संदेश येईपर्यंत थांबतो.”

2 शमुवेल 15:35

सादोक आणि अब्याथार हे याजक तुझ्याबरोबर असतील. राजाच्या घरी जे ऐकशील ते सगळे त्यांच्या कानावर घालत जा.

2 शमुवेल 17:21

इकडे अबशालोमचे नोकर निघून जातात, तो योनाथान आणि अहीमास विहिरीतून बाहेर पडले. तडक राजा दावीदाकडे जाऊन ते त्याला म्हणाले, “असाल तसे निघा आणि नदी ओलांडून पलीकडे जा. अहिथोफेलने तुमच्याविरुध्द असे असे सांगितले आहे.”

2 शमुवेल 20:19

इस्राएलमधील शांतताप्रिय, विश्वासू लोकांपैकी मी एक आहे. इस्राएलच्या एका महत्वाच्या शहराची तुम्ही नासधूस करत आहात. परमेश्वराच्या मालकीच्या वस्तुची तुम्ही मोडतोड का करता?”

स्तोत्रसंहिता 35:25

“आम्हाला हवे होते ते मिळाले,” असे त्या लोकांना म्हणू देऊ नकोस. परमेश्वरा, “आम्ही त्याचा नाश केला” असे त्यांना म्हणू देऊ नकोस.

स्तोत्रसंहिता 55:8

मी पळूत जाईन मी माझी सुटका करेन. मी संकटांच्या वादळापासून दूर पळून जाईन.

स्तोत्रसंहिता 56:2

माझ्या शत्रूंनी माझ्यावर दिवसभर हल्ला केला. मोजता न येण्याइतके लढणारे तिथे आहेत.

स्तोत्रसंहिता 57:3

तो स्वर्गातून मला मदत करतो आणि मला वाचवतो. मला त्रास देणाऱ्या लोकांचा तो पराभव करतो. देव त्याचे खरे प्रेम मला दाखवतो.

नीतिसूत्रे 6:4

विश्रांतीसाठी वा झोपण्यासाठी सुध्दा थांबू नकोस.

मत्तय 24:16

त्यावेळी यहूदातील लोकांनी डोंगरावर पळून जावे.

1 करिंथकरांस 15:54

जेव्हा हे विनाशी शरीर अविनाशीपण धारण करील व हे मर्त्य शरीर अमरत्व धारण करील, तेव्हा पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे होईल.“विजयात मरण गिळले गेले आहे.”यशया 25:8

2 करिंथकरांस 5:4

कारण या घरामध्ये आम्ही असताना आम्ही कण्हतो, आणि ओइयाने दबले जातो. कारण वस्त्रहीन असण्याची आमची इच्छा नसते, पण आमची इच्छा आहे की, आमच्या स्वर्गीय निवासस्थानाने पोशाख करावा. यासाठी की जे मर्त्य आहेत ते जीवनाने गिळावे.

Interlinear

Choose Theme