माझ्या शत्रूंनी माझ्यावर दिवसभर हल्ला केला. मोजता न येण्याइतके लढणारे तिथे आहेत.
Cross references
परमेश्वरा मला खूप शत्रू आहेत. खूप लोक माझ्या विरुद्ध गेले आहेत.
तू मला खूप सुखी करतोस. सर्वशक्तिमान देवा, मी तुझ्या नामाचा महिमा गातो.
परमेश्वरा माझ्या लढाया लढ. माझे युध्द कर.
माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते म्हणतात, “तो कधी मरेल आणि विस्मरणात जाईल?”
जे लोक माझ्याविरुध्द गेले आहेत त्यांना देव शिक्षा करेल. देव माझ्याशी प्रमाणिक असेल आणि तो त्या लोकांचा नाश करेल.
तो स्वर्गातून मला मदत करतो आणि मला वाचवतो. मला त्रास देणाऱ्या लोकांचा तो पराभव करतो. देव त्याचे खरे प्रेम मला दाखवतो.
तुम्ही लपण्यासाठी परात्पर देवाकडे जाऊ शकता. तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमान देवाकडे जाऊ शकता.
परमेश्वराची स्तुती करणे चांगले असते. परात्पर देवा, तुझ्या नावाचे उपकारस्मरण करणे चांगले असते.
परंतु परमेश्वरा, तुला सदैव मान मिळेल.
समुद्राच्या आदळणाऱ्या लाटा फार ताकदवान आहेत आणि त्यांचा आवाज खूप मोठा आहे. परंतु वरचा परमेश्वर अधिक ताकदवान आहे.
बऱ्याच शत्रूंनी मला घेरले होते. परंतु परमेश्वराच्या शक्तीमुळे मी माझ्या शत्रूंचा पराभव केला.
देव अती उच्च व परम थोर आहे. देव चिरंजीव आहे. त्याचे नाव पवित्र आहे. देव म्हणतो, मी उंच आणि पवित्र जागी राहतो हे खरे पण मी दु:खी आणि लीन यांच्याबरोबरही असतो. मनाने नम्र असलेल्यांना आणि दु:खी लोकांना मी नवजीवन देईन.
राजा,परात्पर देवाने, तुझ्या आजोबांना,राजा नबुखद्नेस्सरला खूप मोठा व सामर्थ्यशाली राजा केले. देवाने राजाला खूप महत्व दिले.
परमेश्वराला भेटायला येताना मी काय आणले पाहिजे? स्वर्गातील परमेश्वरापुढे नतमस्तक होताना मी काय केले पाहिजे? होमार्पणे व एक वर्षाचे वासरु घेऊन मी परमेश्वरापुढे यावे का?
आमचा पिता दावीद हा तुझा सेवक होता. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्याने हे शब्द लिहिले:‘राष्ट्रे का ओरडत आहेत? लोक (देवाविरुद्ध) का व्यर्थ कट रचित आहेत?
हे सर्व दुष्ट आत्मे सैतानाचे आत्मेआहेत. ते चमत्कार करातात, हे आत्मे सगळ्या जगातील राजांकडे जातात व त्यांना सर्वसमर्थ देवाच्या महान दिवशीलढाईसाठी एकत्र जमवतात.