2 शमुवेल 17:21 · मराठी बायबल
इकडे अबशालोमचे नोकर निघून जातात, तो योनाथान आणि अहीमास विहिरीतून बाहेर पडले. तडक राजा दावीदाकडे जाऊन ते त्याला म्हणाले, “असाल तसे निघा आणि नदी ओलांडून पलीकडे जा. अहिथोफेलने तुमच्याविरुध्द असे असे सांगितले आहे.”
Cross references
2 शमुवेल 17:15
हूशयने हे सर्व सादोक आणि अब्याथार या याजकांच्या कानावर घातले. अबशालोम आणि इस्राएलमधील वडील मंडळी यांना अहिथोफेलने जे सुचवले ते हूशयने या दोघांना सांगितले. तसेच आपण काय सुचवले तेही साविस्तर सांगितले. हूशय म्हणाला,
स्तोत्रसंहिता 55:7
मी खूप दूर वाळवंटात गेलो असतो.