Home Bibles 2 शमुवेल 17:10 · मराठी बायबल
2 शमुवेल 17:10 · मराठी बायबल

मग तर सिंहासारख्या शूरलोकांचेही धैर्य खचेल. कारण तुमचे वडील पराक्रमी आहेत आणि त्यांच्या बाजूची माणसे शूर आहेत हे सर्वच इस्राएल लोकांना ठाऊक आहे.

Cross references

उत्पत्ति 49:9

यहूदा, तू आपली शिकार मारलेल्या सिंहासारखा आहेस; माझ्या मुला, आपल्या शिकारीचा पशू मारुन त्याच्यावर उभा असलेल्या सिंहासारखा तू आहेस;यहूदा विसावा घेणाऱ्या सिंहासारखा आहेआणि त्याला त्रास देण्याइतका शूर दूसरा कोणीही नाही.

निर्गम 15:15

मग अदोमाची कुटुंबे व मवाबाचे बलवान लोक भीतीने थरथरा कांपतील आणि कनानी लोकांचे धैर्य पावेल.

गणना 24:8

“देवाने त्या लोकांना मिसरमधून आणले. ते रानटी बैलासारखे शक्तिशाली आहेत. ते त्यांच्या सर्व शत्रूंचा पराभव करतील. ते त्यांची हाडे मोडतील आणि त्यांचे बाण तोडतील.

अनुवाद 1:28

आता आम्ही कुठे जाणार? आमच्या या भावांच्या ( 12 हेरांच्या) बातम्यांमुळे घाबरुन आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यांच्या खबरीनुसार हे लोक धिप्पाड व आमच्यापेक्षा उंच आहेत. तेथील नगरे मोठी असून त्यांची तटबंदी आकाशाला भिडली आहे. आणि तेथे अनाक वंशी महाकाय आहेत.

यहोशवा 2:9

त्यांना म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे हे मला माहीत आहे. तुमची आम्हांला भीती वाटते. या देशातील सर्व लोक घाबरून गेले आहेत.

1 शमुवेल 16:18

यावर एक चाकर म्हणाला, “इशाय नावाचा एक माणूस बेथलहेम येथे राहतो. त्याचा मुलगा मला माहीत आहे. त्याला वीणा वाजवता येते. तो चांगला लढवय्या सुध्दा आहे. तो तरनरीत, देखणा असून परमेश्वराची त्याला साथ आहे.”

1 शमुवेल 18:17

शौल मात्र दावीदाच्या जिवावर उठला होता. त्याला पेचात पकडण्यासाठी शौलने एक योजना आखली. तो दावीदला म्हणाला, “ही मेरब माझी मोठी मुलगी. तू हवे तर हिच्यशी लग्न्न कर. मग तू आणखीच सामर्थ्यवान होसील. तू माझ्या मुलासारखाच होशील. मग तू परमेश्वराच्या वतीने लढाया कर.” ही एक युक्ती होती. प्रत्यक्षात शौलचा विचार वेगळाच होता. ‘आता मला त्याचा जीव घ्यायला नको. परस्पर पलिष्टीच त्याचा काटा काढतील’ असा त्याचा बेत होता.

2 शमुवेल 1:23

शौल आणि योनाथान यांनी आयुष्यभर परस्परांवर प्रेम केले. एकमेकांना आनंद दिला मृत्यूनेही त्यांची ताटातूट केली नाही. गरुडांहून ते वेगवान् आणि सिंहापेक्षा बलवान् होते!

2 शमुवेल 23:20

यहोयादा याचा मुलगा बनाया हाही एक होता. तो एका पराक्रमी माणसाचा पुत्र होता. तो कबसेल इथून आलेला होता. बनायाने बरेच पराक्रम गाजवले. मवाबमधील अरीएलच्या दोन मुलांना त्याने मारले. एकदा बर्फ पडत असताना त्याने गुहेत शिरून सिंह मारला.

नीतिसूत्रे 28:1

वाईट लोकांना सगळ्याचीच भीती वाटते. कोणी त्यांचा पाठलाग करत नसले तरी ते दूर पळतात. पण चांगला माणूस सिंहासाखा शूर असतो.

गीतरत्न 3:7

ही बघ, शलमोनाची प्रवासाला जाण्याची खुर्ची! साठ सैनिक, इस्राएलचे शक्तिमान सैनिक तिचे रक्षण करीत आहेत.

यशया 13:7

लोकांचे धैर्य गळेल. त्यांची भीतीने गाळण उडेल.

यशया 19:1

मिसरबद्दल शोक संदेश पाहा, परमेश्वर, जलद गतीने जाणाऱ्या मेघावर आरूढ होऊन येत आहे. देव मिसरमध्ये प्रवेश करील आणि तेथील खोटे देव भीतीने थरथर कापू लागतील. मिसर खरा धैर्यवान होता पण त्याचे धैर्य गरम मेणाप्रमाणे वितळून जाईल.

इब्री लोकांस 11:34

त्यांनी अग्निचे सामर्थ्य नष्ट केले. तरवारीने मरण्यापासून बचावले. अशक्तपणात त्यांनी सामर्थ्य मिळविले. ते लढाईत सामर्थ्यशाली ठरले. आणि त्यांनी परकी सेना मागे हटविली.

Interlinear

Choose Theme