Home Bibles 2 शमुवेल 17:9 · मराठी बायबल
2 शमुवेल 17:9 · मराठी बायबल

एखाद्या गुहेत किंवा निर्जन ठिकाणी ते कदाचित् गेले सुध्दा असतील त्यांना तुमच्या लोकांवर आधी हल्ला केला तर लोक ते ऐकून म्हणतील, “अबशालोमचे लोक हरत चाललेले दिसत आहेत.’

Cross references

यहोशवा 8:6

हे लोक आमचा पाठलाग करत नगरापासून दूर येतील. पूर्वींप्रमाणेच आपल्याला भिऊन हे पळ काढत आहेत असे त्यांना वाटेल (त्यांचा हा समज कायम ठेवायला) आम्ही पळत सुटू.

शास्ते 20:32

पूर्वीप्रमाणेच आपला जय होत आहे असे बन्यामीनांना वाटले. इस्राएल पळ काढत होते. पण ती त्यांची एक चाल होती. बन्यामीनांना शहरापासून लांब रस्तयावर यायला लावायचे असा त्यांचा डाव होता. प्रथम यहूदाने जावे असे परमेश्वराने सांगितले

1 शमुवेल 22:1

दावीद मग गथहून निघाला तो अदुल्लाम गुहेत पोचला. दावीदाच्या भावांनी आणि नातलगांनी हे ऐकले तेव्हा ते त्याला तिथे भेटायला गेले.

1 शमुवेल 23:22

आता त्याच्या बद्दल अधिक माहिती काढा. तो कुठे आहे, त्याला कोणीकोणी पाहिले आहे याचा पत्ता लावा.” शौलने विचार केला. ‘दावीद फार धूर्थ आहे, तो माझ्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करत आहे.’

1 शमुवेल 24:3

रस्त्यालगतच्या मेंढवाड्याजवळ शौल आला. तिथे एक गुहा होती. शौल तिथे बहिर्दीशेकरता गेला. दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक गुहेत पार आतल्या बाजूला होते.

Interlinear

Choose Theme