Home Bibles यशया 13:7 · मराठी बायबल
यशया 13:7 · मराठी बायबल

लोकांचे धैर्य गळेल. त्यांची भीतीने गाळण उडेल.

Cross references

निर्गम 15:15

मग अदोमाची कुटुंबे व मवाबाचे बलवान लोक भीतीने थरथरा कांपतील आणि कनानी लोकांचे धैर्य पावेल.

यशया 10:3

कायदे करणाऱ्यांनो, तुम्हाला तुमच्या कृत्याचा जाब द्यावा लागेल, तेव्हा तुम्ही काय सांगाल? दूरच्या देशातून तुमचा विध्वंस येत आहे. तेव्हा मदतीसाठी कोठे धावाल? तुमची धनसंपत्ती तेव्हा उपयोगी पडणार नाही.

यशया 19:1

मिसरबद्दल शोक संदेश पाहा, परमेश्वर, जलद गतीने जाणाऱ्या मेघावर आरूढ होऊन येत आहे. देव मिसरमध्ये प्रवेश करील आणि तेथील खोटे देव भीतीने थरथर कापू लागतील. मिसर खरा धैर्यवान होता पण त्याचे धैर्य गरम मेणाप्रमाणे वितळून जाईल.

यशया 37:27

त्या शहरात राहणारे लोक दुबळे होते. ते घाबरलेले व खजील झालेले होते. शेतात वाढणाऱ्या तणाप्रमाणे ते लोक होते. घराच्या छपरावर उगवणाऱ्या गवतासारखे ते होते. ते उंच होण्यापूर्वीच वाळवंटातील गरम झळांनी जळून जाते.

यशया 51:20

तुझे लोक दुबळे होऊन जमिनीवर पडले आणि तिथेच पडून राहिले. प्रत्येक चौकात ते पडून राहिले. ते जणू जाळ्यात पकडलेले प्राणी होते. त्यांना आणखी शिक्षा सहन न होईपर्यंत परमेश्वराने रागाने त्यांना शिक्षा केली. जेव्हा देव त्यांना म्हणाला की मी तुम्हाला आणखी शिक्षा करीन, तेव्हा ते अगदीच लोळागोळा झाले.

यिर्मया 50:43

बाबेलच्या राजाने ह्या सैन्याबद्दल ऐकले, आणि तो फारच घाबरला. भीतीने त्याचे हातपाय गळून गेले. प्रसून्न होणाऱ्या स्त्रीप्रमाणे त्याला कष्ट झाले.”

यहेज्केल 7:17

लोक इतके दमलेले व दु:खी कष्टी असतील की ते हात उचलू शकणार नाहीत, त्यांचे पाय पाण्याप्रमाणे होतील.

यहेज्केल 21:7

मग ते तुला विचारतील ‘तू दु:ख का करीत आहेस?’ मग तू सांगितले पाहिजेस ‘वाईट बातमीसाठी हा शोक आहे. त्या बातमीने सर्वांची मने खचतील, हात लुळे पडतील, मने दुर्बल होतील, त्यांचे गुढघे पाण्याप्रमाणे गळून जातील. पाहा! ती वाईट बातमी येत आहे.’ त्यामुळे ह्या गोष्टी घडतीलच.” परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला,

यहेज्केल 21:12

“मानवपुत्रा, मोठ्याने ओरड व किंचाळ का? कारण तलवार माझ्या लोकांवर व इस्राएलच्या राज्यकर्त्यांवर चालविली जाणार आहे. त्या राजकर्त्यांना युद्ध हवे होते. म्हणून तलवार येईल तेव्हा ते माझ्या लोकांबरोबर असतील. तेव्हा मांडीवर थापट्या मार आणि दु:ख प्रदर्शित करण्यासाठी मोठ्याने आक्रोश कर.

नहूम 1:6

परमेश्वराच्या भयंकर क्रोधाला कोणीही तोंड देऊ शकणार नाही त्याचा भयानक राग कोणीही सहन करू शकणार नाही त्याचा क्रोध अग्नीप्रमाणे धगधगणारा असेल. तो येताच खडक हादरतील.

नहूम 2:10

आता निनवे ओसाड झाले आहे सर्व चोरीला गेले आहे शहर उद्ध्वस्त झाले आहे लोकाचे धैर्य खचले आहे भीतीने हदयाचे पाणी होत आहे पाय लटपटत आहेत शरीरांचा थरकाप होत आहे चेहेरे पांढरेफटक पडले आहेत.

नहूम 2:11

कोठे आहे ती सिंहाची गुहा (निनवे)? सिंह-सिंहिणी तेथे राहात होत्या त्यांचे छावे निडर होते.

Interlinear

Choose Theme