Home Bibles ☰ Books 2 शमुवेल 14:12 · मराठी बायबल
2 शमुवेल 14:12 · मराठी बायबल

मग ती म्हणाली, “माझे स्वामी, मला तुमच्याशी आणखी काही बोलायचे आहे परवानगी असावी.”राजा म्हणाला, “बोल”

Cross references

उत्पत्ति 18:27

मग अब्राहाम म्हणाला, “हे प्रभु, तुझ्या तुलनेने मी केवळ धूळ व राख आहे, तरी तुला एक प्रश्न विचारु दे;

उत्पत्ति 18:32

अब्राहाम म्हणाला, “प्रभु, कृपा करुन माझ्यावर रागावू नकोस, परंतु शेवटी एकदाच थोडा त्रासदायक प्रश्न विचारण्यास परवानगी असावी, कदाचित् तुला तेथे दहाच लोक चांगले आढळले तर तू काय करशील?”परमेश्वर म्हणाला, “जर मला नगरात दहाच लोक चांगले आढळले तर त्या दहाकरिता मी नगराचा नाश करणार नाहीं.”

उत्पत्ति 44:18

मग यहूदा योसेफाकडे जाऊन म्हणाला, “कृपा करुन माझ्यावर रागावू नका परंतु अगदी खरेपणाने व मोकळेपणाने मला आपल्याबरोबर बोलू द्या. आपण फारो राजासमान असून इतके अधिकार आपणाला आहेत हे मी जाणतो.

1 शमुवेल 25:24

त्याच्या पायाशी लोळण घेत ती त्याला म्हणाली, “कृपया मला बोलू द्या. मी काय म्हणते ते ऐकून घ्या. जे झाले त्याबद्दल दोष माझा आहे.

2 शमुवेल 20:17

यवाब तिच्याशी बोलायला गेला. तिने त्याला तूच यवाब का म्हणून विचारले.यवाबाने होकार भरला. तेव्हा ती म्हणाली, “माझे ऐक.” यवाब म्हणाला, “सांग मी ऐकतोय.”

1 राजे 2:14

मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.”बथशेबा म्हणाली, “मग बोल.”

यिर्मया 12:1

परमेश्वरा, जेव्हा मी तुझ्याशी वाद घालतो, तेव्हा तुझेच म्हणणे बरोबर ठरते. पण काही गोष्टी बरोबर वाटत नाहीत. त्याबद्दल मला तुला विचारावेसे वाटते. दुष्ट लोकच यशस्वी का होतात? तू ज्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाहीस, अशांना सुखाचे आयुष्य का मिळते?

प्रेषितांचीं कृत्यें 26:1

अग्रिप्पा पौलाला म्हणाला, “तुला तुझी बाजू मांडायला परवानगी आहे.” यावर पौलाने आपला हात उंच करुन आपल्या बचावाचे भाषण सुरु केले:

Interlinear

Choose Theme