Home Bibles 2 शमुवेल 14:13 · मराठी बायबल
2 शमुवेल 14:13 · मराठी बायबल

त्यावर ती म्हणाली, “तुम्ही देवाच्या लोकांच्या विरुद्ध योजना का केली आहे? होय, तुम्ही असे म्हणालात तेव्हा तुम्ही स्वत: दोषी ठरता. कारण तुम्ही आपल्या घराबाहेर घालवलेल्या मुलाला पुन्हा परत आणलेले नाही.

Cross references

शास्ते 20:2

इस्राएलाच्या सर्व वंशातील वडिलधाऱ्या मंडळीनी या सभेत आपापल्या जागा घेतल्या. चार लाखांचे सैन्य तलवारी घेऊन सज्ज होते.

2 शमुवेल 7:8

“शिवाय दावीदाला हे ही सांग “सर्वशकितमान परमेश्वर असे म्हणतो. तू कुरणात मेंढरांमागे फिरत होतास तेव्हाच मी तुला निवडले आहे. तेथून तुला काढून मी तुला इस्राएल लोकांचा नेता केले.

2 शमुवेल 12:7

तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, “तूच तो माणूस आहेस. इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, “इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला. तुला शौलापासून वाचवले.

2 शमुवेल 13:37

दावीद अम्नोनसाठी रोज अश्रू ढाळे.अम्मीहूरचा मुलगा तलमय गशूरचा राजा होता. अबशालोम त्याच्याकडे आश्रयाला आला.

2 शमुवेल 13:38

गशूर येथे तो तीन वर्षे राहिला.

1 राजे 20:40

पण मी इतर कामात गुंतलो होतो. तेव्हा तो माणूस पळून गेला.”यावर इस्राएलचा राजा म्हणाला, “त्या सैनिकाला तू निसटू दिलेस हा तुझा गुन्हा तुला मान्य आहे. तेव्हा निकाल उघडच आहे. तो माणूस म्हणाला ते तू केले पाहिजेस.”

लूक 7:42

ते कर्ज फेडू शकत नसल्याने सावकाराने दोघांचीही कर्ज माफ केली, आता त्यांच्यापैकी कोण त्याच्यावर अधिक प्रेम करील?”

Interlinear

Choose Theme