ती तकोवा येथील बाई पुन्हा राजाला म्हणाली, “परमेश्वरा देवाच्या नावाची शपथ वाहून सांगा की या लोकांचा तुम्ही बंदोबस्त कराल. त्यांना भावाचा खून केल्याबद्दल माझ्या मुलाला शासन करायचे आहे. तेव्हा त्याला धक्का पोहचणार नाही याचे मला आश्वासन द्या.”दावीद म्हणाला, “परमेश्वर असे पर्यंत कोणीही तुझ्या मुलाला इजा करणार नाही. त्याच्या केसालाही धक्का पोचणार नाही.”
Cross references
परंतु अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “आकाश व पृथ्वीचा निर्माणकर्ता परमेश्वर, परात्पर देव याला मी वचन देतो की,
अब्राहामाचा सर्वात म्हातारा सेवक होता; तो त्याच्या सर्व मालमत्तेचा व घरदाराचा कारभार पाहणारा मुख्य कारभारी होता. एकदा अब्राहामाने त्याला बोलावून म्हटले, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव
नंतर लाबान म्हणाला, “जर का तू माझ्या कन्यांना दु:ख देशील तर देव तुला शिक्षा करील हे लक्षात ठेव. जर का तू इतर स्त्रियांशी लग्न करशील तर देव पाहात आहे हे लक्षात ठेव.
मेलेल्या माणसाच्या कुटुंबातील कुणीही त्या खुन्याचा पाठलाग करुन त्याला ठार मारू शकतो.
धान्य, नवीन द्राक्षारस व तेल या आपल्या उत्पन्नातील पहिला वाटाही त्यांना द्यावा. तसेच मेंढरांची पहिल्यांदा कातरलेली लोकरही लेवींना द्यावी.
एखाद्याच्या हातून चुकून मनुष्यवध झाला, व त्याचा खुनाचा उद्देश नसेल तर तो माणूस या नगरात आश्रयाला जाऊ शकतो.
पण सर्व सैनिक शौलला म्हणाल, “योनाथानने आज इस्राएलकडे विजय खेचून आणला आहे. तेव्हा त्याने मेलेच पाहिजे का? खचितच नाही. आम्ही परमेश्वरापुढे शपथ घेऊन सांगतो की त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. पलिष्ट्यांविरुद्ध लढायला परमेश्वराने योनाथानला मदत केली आहे.” अशाप्रकारे लोकांनी योनाथानला वाचवले. त्याला मृत्यूची सजा झाली नाही.
योनाथान दावीदला म्हणाला, “शांत चित्ताने जा. परमेश्वराची शपथ घेऊन आपण मैत्रीच्या आणाशपथा घेतल्या आहेत. आपण आणि आपले वंशज यांना परमेश्वर, चिरंतन साक्षी आहे.”
शौलने परमेश्वराची शपथ घेऊन तिला वचन दिले की परमेश्वर जिवंतअसेतो तुला शिक्षा होणार नाही.
राजा यवाबाला म्हणाला, “माझे वचन मी खरे करीन, आता अबशालोमला परत आणा,”
तेव्हा शलमोन म्हणाला, “एक भला गृहस्थ असल्याचे अदोनीयाने सिध्द केले तर त्याच्या केसालाही इजा होणार नाही. पण त्याने आगळीक केल्यास त्याची गय केली जाणार नाही. तो मरण पावेल.
तू ह्या गोष्टी केल्यास, तर तू शपथ घेण्यासाठी माझे नाव वापरु शकशील. ‘परमेश्वर असे तो पर्यंत,’ असे तू म्हणू शकशील. तू हे शब्द खऱ्या, प्रमाणिक आणि योग्य, तऱ्हेने वापरु शकशील. तू ह्या गोष्टी केल्यास परमेश्वर राष्ट्रांना आशीर्वाद देईल. ती राष्ट्रे परमेश्वराने केलेल्या कृत्यांबद्दल बढाया मारतील.”
“आणि तुमच्या डोक्यावरचे केससुद्धा त्याने मोजलेले आहेत.
तुम्ही थोडे तरी खा. कारण तुमचा टिकाव लागण्यासाठी तुम्ही खाणे जरुरीचे आहे. तुम्ही खावे अशी मी तुम्हांला विनंति करतो. तुमच्यापैकी कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही.”