धान्य, नवीन द्राक्षारस व तेल या आपल्या उत्पन्नातील पहिला वाटाही त्यांना द्यावा. तसेच मेंढरांची पहिल्यांदा कातरलेली लोकरही लेवींना द्यावी.
Cross references
तेव्हा लाबान पूर्वी आपल्याशी जसा मित्राप्रमाणे प्रेमाने वागत आला होता तसा तो आता वागत नसल्याचे याकोबाच्या लक्षात आले;
ही शहरे इस्राएलच्या नागरिकांसाठी, परदेशी नागारिकासाठी आणि प्रवाशांसाठी शरणपुरे असतील. यांच्यापैकी कुणीही चुकून कुणाला ठार मारले तर ते संरक्षणसाठी या शहरात जाऊ शकतात.
अशासाठी की, पूर्वी काही वैर नसताना, न जाणता एखाद्याने कोणाची चुकून हत्या केली तर त्याला ह्यातल्या एखाद्या नगराचा आसरा घेता यावा. मृत्युदंडाला सामोरे जावे लागू नये.
“प्रत्येक लेवीच्या मंदिरातील सेवेच्या ठराविक वेळा असतील. पण दुसऱ्या कुठल्या वेळेला त्याला काम करायचे असल्यास तो करु शकतो. इस्राएलमध्ये कुठल्याही नगरात राहणारा कुणीही लेवी घर सोडून परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी येऊ शकतो. हे केव्हाही करायची त्याला मुभा आहे.
पण फार जवळून जाऊ नका. त्यांच्या पासून सुमारे एक हजार यार्ड अंतर ठेवा. या पूर्वी कधी या वाटेने तुम्ही गेला नाहीत. तेव्हा ती कळावी म्हणून त्यांच्या मागून जा.”
पूर्वी लढाईत तू आमचे नेतृत्व केले आहेस. शौल राजा असतानाही तू ते केले आहेस. परमेश्वर तुला म्हणाला, ‘दावीदा, तू माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ होशील. माझ्या लोकांचे नेतृत्व करशील.”‘
पूर्वीपासून तोफेत तयार करून ठेवले आहे. ते राजासाठी तयार केले आहे. ते पुष्कळ खोल आणि रूंद केले आहे. त्यात लाकडाचा ढीग आणि विस्तव आहे. परमेश्वराचा श्वास (आत्मा) जळत्या गंधकाच्या प्रवाहाप्रमाणे येऊन ते जाळून टाकील.