अबशालोमने आपल्या नोकरांना आज्ञा दिली. तो म्हणाला, “अम्नोनवर नजर ठेवा. मद्याचा आनंद घेत घेत त्याला जेव्हा त्याची नशा चढेल तेव्हा मी तुम्हाला संकेत करीन. मग त्याच्यावर हल्ला करुन तुम्ही त्याला ठार करा. शिक्षेची भीती बाळगू नका. अखेर तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन करत आहात. धैर्याने आणि खंबीरपणाने वागा.”
Cross references
त्याने द्राक्षारस तयार केला व तो भरपूर प्याला; तो द्राक्षारसाने धुंद झाला व आपल्या तंबूत उघडानागडा पडला.
तर आता आपणाला मुले होण्याकरिता आपण आपल्या वडिलांचा उपयोग करु, तेव्हा आपण आपल्या वडिलाकडे जाऊन त्यांना भरपूर द्राक्षमद्य पाजू आणि मग त्यांच्यापाशी निजू म्हणजे मग त्यामुळे आपला वंश चालू राहील.”
तो म्हणला, “तुम्ही इब्री स्त्रियांना बाळंतपणात सहाय्य करण्याचे काम चालू ठेवा. त्या स्त्रियांना मुलगी झाली तर तिला जिवंत ठेवा; परंतु त्यांना मुलगा झाला तर त्याला अवश्य मारून टाका.”
तेव्हा मिसरच्या राजाने त्या सुइणींना बोलावून विचारले, “तुम्ही असे का केले? तुम्ही जन्मलेल्या मुलांना का जिवंत ठेवले?”
ते बलामकडे गेले आणि म्हणाले, “बालाक, सिप्पोराचा मुलगा तुला हे सांगतो: तुझ्या इथे येण्याच्या आड कुठलीही गोष्ट येऊ देवू नको.
खंबीर आणि निर्भय राहण्याची मी तुला आज्ञा केली आहे ना? तेव्हा कचरू नकोस. परमेश्वर तू जेथे जाशील तेथे तुझ्या बरोबर आहे.”
सासरे जावयांनी एकत्र बसून न्याहारी केली. पुन्हा मुलीचे वडील म्हणाले, “आता आजच्या दिवस राहा, आराम करा. मग दुपारनंतर निघा.” मग दोघांची जेवणे झाली.
लेवी, त्याची उपपत्नी आणि नोकर आता जायला निघाले. पण तिचे वडील म्हणाले, “आता तर अंधारुन आले आहे. दिवस मावळला. रात्री इथेच राहा आणि सकाळी लौकर उठून आपल्या मार्गाला लागा.”
हे सगळे मजेत गप्पगोष्टी करत बसले आहेत तितक्यात गावातल्या काही वाह्यात गुंडांनी घराभोवती गर्दी केली. दार वाजवायला सुरुवात केली. म्हाताऱ्या घरमालकावर ते ओरडू लागले. “तुझ्याकडच्या पाहुण्याला बाहेर काढ. लैगिक मौजमजेसाठी तो आम्हाला हवा आहे.” असा एकच ओरडा त्यांनी चालवला.
जेवणखाण झाल्यावर बवाज समाधानाने सुस्तावला. धान्याच्या राशीजवळच झोपायला गेला. तेव्हा अजिबात चाहूल लागू न देता रूथ तिथे गेली आणि त्याच्या पायावरचे पांधरूण तिने दूर सारले. मग त्याच्या पायाशी पडून राहिली.
शौलने आपल्या अधिकाऱ्यांना आज्ञा दिल्या. त्यांना तो म्हणाला, “त्याला विश्वासात घेऊन हळूच सांगा, ‘राजाला तू आवडतोस. तू त्याच्या अधिकाऱ्यांच्या मर्जीतला आहेस. तेव्हा राजाच्या मुलीशी तू लग्न्न कर.”
राजाने मग आपल्या जवळच्या रक्षकांना हुकूम केला, “परमेश्वराच्या याजकांना ठार करा. त्यांनी दावीदाची बाजू घेतली म्हणून त्यांना ही सजा आहे. दावीदाच्या पलायनाची त्यांना खबर असून त्यांनी मला तसे कळवले नाही.”पण राजाच्या सेवकांनी परमेश्वराच्या याजकांवर शस्त्र उगारायला नकार दिला.
अबीगईल नाबालकडे गेली. तो घरीच होता. राजाच्या इतमामात खात पीत होता. मद्याच्या नशेत झिंगला होता व मजेत होता. तेव्हा दुसऱ्या दिवशीपर्यंत ती त्याच्याशी या विषयावर काहीच बोलली नाही.
शौलने परमेश्वराची शपथ घेऊन तिला वचन दिले की परमेश्वर जिवंतअसेतो तुला शिक्षा होणार नाही.
तेव्हा राजा म्हणाला, “घाबरु नकोस. तुला काय दिसते ते सांग.” ती म्हणाली, “मला एक आत्मा भूमीतून वर येताना दिसतोय.”
दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने त्याला भेटायला बोलावले. दावीदाबरोबर उरीयाने जेवणखाण केले. दावीदाने त्याला बेहोश होईपर्यंत मद्य पाजले. पण तरी उरीया घरी गेला नाही. त्या संध्याकाळी तो राजाच्या सेवकांबरोबरच महालाच्या दाराशी झोपायला गेला.
त्या पत्रात दावीदाने लिहिले होते. “आघाडीवर जेथे तुंबळ युध्द चालले असेल तेथे उरीयाला पाठव. त्याला एकट्याला तेथे सोडा म्हणजे तो युध्दात कामी येईल.”
तेव्हा आता ही तलवार तुझ्या कुटुंबाचा पिच्छा सोडणार नाही. तू उरीया हित्तीच्या बायकोचे हरण केलेस. तुला माझी पर्वा नाही हेच यातून दिसते.’
मला दोन मुलगे होते. एकदा शेतात त्यांचे भांडण जुंपले, त्यांना थोपवायलाही कोणी नव्हते. तेव्हा एकाने दुसऱ्याचा जीव घेतला.
राजा बेन - हदाद आणि त्याच्या बाजूचे बत्तीस राजे दुपारी आपापल्या तंबूमध्ये मद्यपान करण्यात आणि नशेत गुंग होते. त्यावेळी अहाबने हल्ला चढवला.
मेजवानीच्या सातव्या दिवशी राजा अहश्वेरोश द्राक्षारस प्याल्याने उत्तेजित मन: स्थितीत होता. तेव्हा आपल्या तैनातीत असलेल्या महूमान, बिजथा, हरबोना, बिगथा, अवगथा, जेथर आणि कर्खस या सात खोजांना त्याने राणीला राजमुगुट घालून आपल्याकडे आणण्यास सांगितले. राणी खूप सुंदर होती. तेव्हा आपले सर्व अधिकारी व सरदार यांच्यासमोर तिने आपले रुप दाखवावे अशी त्याची इच्छा होती.
देव आपल्याला आनंदित करणारा द्राक्षारस देतो. आपली कातडी मऊ करणारे तेल देतो आणि आपल्याला बलवान बनवणारे अन्न देतो.
तेव्हा आता जा, तुमचे अन्न खा आणि त्याचा आनंद उपभोगा. द्राक्षारस (मद्य) प्या आणि आनंदी व्हा. तुम्ही या गोष्टी केल्या तर देवाला ते बरेच वाटेल.
लोकांना खायला आवडते, आणि द्राक्षारस (मद्य) आयुष्य आनंदी करतो. पण पैसा अनेक समस्यांची उकल करतो.
राजाने मद्य पिता-पिता आपल्या सेवड्ढांना सोन्या चांदीचे प्याले आणण्याचा हुकूम दिला. हे प्याले, त्याचे आजोबा नबुखद्नेस्सर यांनी यरुशलेमच्या मंदिरातून आणले होते. राजघराण्यातील लोकांनी राजाच्या स्त्रियांनी आणि दासींनी त्या प्याल्यांतून मद्य प्यावे अशी राजाची इच्छा होती.
भांड्याखाली जळणाव्या काटेरी झुडपाप्रमाणे तुझा संपूर्ण नाश होईल सुक्या काटक्या जशा चटकन् जळून जातात, तसा तुझा पटकन् नाश होईल.
सावध राहा, दारुबाजी आणि अधाशीपणात तुमचा वेळ घालवू नका, किंवा ऐहिक गोष्टींमध्ये मग्न राहू नका. जर तुम्ही तसे कराल, तर तुम्ही व्यवस्थित विचार करु शकणार नाही, व तुम्ही तयार नसताना तो दिवस (शेवट) अकस्मात तुमच्यावर येईल.
पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्हांला देवाची आज्ञा पाळलीच पाहिजे, तुमची नाही!