Home Bibles 2 शमुवेल 1:8 · मराठी बायबल
2 शमुवेल 1:8 · मराठी बायबल

त्याने माझी चौकशी केली. मी अमालेकी असल्याचे त्याला सांगितले.

Cross references

उत्पत्ति 14:7

त्यानंतर कदार्लागोमर राजा उत्तरेकडे वळाला व एन मिशपात म्हणजे कादेश येथे जाऊन त्याने अमालेकी लोकांचा पराभव केला; तसेच हससोन - तामार येथे राहणाऱ्या अमोरी लोकांचाही पराभव केला.

निर्गम 17:8

रफिदीम येथे अमालेकी लोक इस्राएल लोकांवर चालून आले आणि त्यांनी त्यांच्याशी लढाई केली.

गणना 24:20

नंतर बलामने अमालेकी लोकांना पाहिले आणि तो हे म्हणाला:“सर्व अमालेकी बलिष्ठ आहेत. पण अमालेकचा सुद्धा नाश होईल.”

अनुवाद 25:17

“तुम्ही मिसरमधून येत असताना अमालेक येथील लोक तुमच्याशी कसे वागले ते आठवा.

1 शमुवेल 15:3

तेव्हा आता त्यांच्याशी जाऊन लढ. त्यांचा आणि त्यांच्या मालमत्तेचा पूर्णपणे बीमोड कर. काहीही शिल्लक ठेवू नकोस. पुरुष, बायका, मुले, अगदी तान्ही बाळेसुध्दा मारुन टाक. त्याची गुरे, मेंढरे, उंट, गाढवे या सर्वाचा संहार कर.”

1 शमुवेल 27:8

शूर जवळच्या तेलेमपासून पार मिसरर्यंत जे अमालेकी आणि गशूरी लोक राहात त्यांच्यावर दावीदाने आपल्या माणसांसह हल्ले केले. त्यांचा पराभव करुन त्यांना लुटले.

1 शमुवेल 30:1

दावीद आणि त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिकलाग येथे आली. अमालेक्यांनी सिकलाग आणि नेगेव भागावर हल्ला चढवून सिकलाग शहर भस्मसात केलेले त्यांनी पाहिले.

1 शमुवेल 30:13

दावीदाने त्याला विचारले, “तुझा मालक कोण? तू आलास कुठून?”तो मिसरी म्हणाला, “मी मिसरी असून एका अमालेक्यांचा गुलाम आहे. तीन दिवसांपूर्वी मी आजारी पडलो तेव्हा माझ्या धन्याने मला सोडून दिले.

1 शमुवेल 30:17

दावीदाने त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना मारले. सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्यांच्यात लढाई झाली. अमालेक्यांपैकी चारशे तरुण आपापल्या उंटांवर स्वार होऊन पळून गेले. ते वगळता कोणीही वाचले नाही.

Interlinear

Choose Theme