Home Bibles 2 शमुवेल 1:7 · मराठी बायबल
2 शमुवेल 1:7 · मराठी बायबल

शौलाने मागे वळून पाहिले तेव्हा त्याला मी दिसलो. त्याने मला बोलावले आणि मी ओ दिली.

Cross references

शास्ते 9:54

अबीमलेख आपल्या सशस्त्र नोकराला तेवढड्यात म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि मला ठार कर “एका बाईने” अबीमलेखला मारले असे लोकांनी म्हणता कामा नये म्हणून तुझ्या हातून मला मरण येऊ दे.” तेव्हा त्याची शस्त्रे वाहून नेणाऱ्या सेवकाने त्याला तलवारीने भोसकले व अबीमलेख मरण पावला.

1 शमुवेल 22:12

शौल अहीमलेखाला म्हणाला, “अहीटूबच्या मुला, आता ऐक.”अहीमलेख म्हणाला, “आज्ञा. सरकार.”

2 शमुवेल 9:6

योनाथानच्या मुलगा मफीबोशेथ आला आणि राजापुढे नतमस्तक होऊन उभा राहिला, “मफीबोशेथ?” राजाने विचारले.मफीबोशेथ म्हणाला, “होय, मीच तुमचा सेवक मफीबोशेथ.’

यशया 6:8

नंतर मला माझ्या परमेश्वराचा आवाज ऐकू आला. परमेश्वर म्हणाला, “मी कोणाला पाठवू! आमच्यासाठी कोण जाईल?”मग मी म्हणालो, “हा मी तयार आहे, मला पाठव.”

यशया 65:1

परमेश्वर म्हणतो, “माझ्याकडे सल्ला मागण्याकरिता न आलेल्या लोकांनाही मी मदत केली. जे मला शोधत नव्हते, त्यांनाही मी सापडलो. माझे नाव धारण न करणाऱ्या राष्ट्रबरोबर मी बोललो. मी म्हणालो, ‘मी येथे आहे! मी येथे आहे!’

Interlinear

Choose Theme