Home Bibles निर्गम 17:8 · मराठी बायबल
निर्गम 17:8 · मराठी बायबल

रफिदीम येथे अमालेकी लोक इस्राएल लोकांवर चालून आले आणि त्यांनी त्यांच्याशी लढाई केली.

Cross references

उत्पत्ति 14:7

त्यानंतर कदार्लागोमर राजा उत्तरेकडे वळाला व एन मिशपात म्हणजे कादेश येथे जाऊन त्याने अमालेकी लोकांचा पराभव केला; तसेच हससोन - तामार येथे राहणाऱ्या अमोरी लोकांचाही पराभव केला.

उत्पत्ति 36:12

अलीपाज याची तिम्ना नावांची एक गुलामस्त्री होती; तिम्ना व अलीपाज यांना एक मुलगा झाला; त्याचे नाव अमालेक.

उत्पत्ति 36:16

कोरह, गाताम व अमालेख;हे आपापल्या कुळांचे प्रमुख एसावास त्याची बायको आदा हिच्या पोटी झाले.

गणना 13:29

अमालेकी लोक नेगेबमध्ये राहतात. हित्ती, यबूसी आणि अमोरी डोंगराळ भागात राहतात. आणि कनानी लोक समुद्राजवळ आणि यार्देन नदीच्या काठावर राहतात.”

गणना 24:20

नंतर बलामने अमालेकी लोकांना पाहिले आणि तो हे म्हणाला:“सर्व अमालेकी बलिष्ठ आहेत. पण अमालेकचा सुद्धा नाश होईल.”

अनुवाद 25:17

“तुम्ही मिसरमधून येत असताना अमालेक येथील लोक तुमच्याशी कसे वागले ते आठवा.

अनुवाद 25:18

त्यांना देवाविषयी आदर नव्हता. तुम्ही दमले भागलेले असताना त्यांनी तुमच्यावर हल्ला केला. दमून मागे पडलेल्या तुमच्यातील दुर्बळांना त्यांनी ठार केले.

शास्ते 6:3

कारण मिद्यानी आणि पूर्वेकडील अमालेकी वारंवार त्यांच्या पिकांची नासधूस करत.

1 शमुवेल 14:48

पराक्रम गाजवला. इस्राएलांची लूट करणाऱ्या सर्व शत्रूंपासून इस्राएलांची सुटका केली. अमालेकांचाही त्याने पराभव केला.

1 शमुवेल 15:2

सर्व शक्तिमान परमेश्वराचे म्हणणे आहे. “इस्राएल लोक मिसर मधून बाहेर पडले तेव्हा अमालेकींनी त्यांना कनानच्या वाटेवर अडवले. अमालेक्यांचे हे कृत्य मी पाहिले आहे.

1 शमुवेल 30:1

दावीद आणि त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिकलाग येथे आली. अमालेक्यांनी सिकलाग आणि नेगेव भागावर हल्ला चढवून सिकलाग शहर भस्मसात केलेले त्यांनी पाहिले.

Interlinear

Choose Theme