Home Bibles 2 राजे 21:24 · मराठी बायबल
2 राजे 21:24 · मराठी बायबल

आणि ज्यांनी आमोनशी फितुरी केली त्या सेवकांना देशातील लोकांनी जिवे मारले. मग आमोनचा मुलगा योशीया याला लोकांनी राजा केले.

Cross references

1 शमुवेल 11:15

त्याप्रमाणे सर्वजण गिलगाल येथे जमले. परमेश्वरासमोर त्यांनी शौलला राजा केले. परमेश्वरासमोर शांत्यर्पणे केली. शौल आणि सर्व इस्राएली यांनी उत्सव साजरा केला.

2 शमुवेल 5:3

मग इस्राएल मधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाला भेटायला हेब्रोन येथे आली. दावीदाने या सर्वांबरोबर परमेश्वरासमक्ष करार केला. त्यानंतर दावीदाला त्या सर्वांनी इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला.

1 राजे 12:1

शलमोनाकडून पळाल्यावर नबाटाचा मुलगा यराबाम मिसरमध्ये गेला. तो अजून तिथेच होता. शलमोनाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर एफाईमच्या डोंगराळ भागातील जेरेदा या आपल्या नगरात तो परतला.शलमोन मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. त्यानंतर त्याचा मुलगा रहबाम हा पुढचा राजा झाला.

1 राजे 12:20

यराबाम परत आला आहे असे इस्राएल लोकांना कळले. तेव्हा त्यांनी सगळ्यांची सभा भरवून त्याला इस्राएलचा राजा म्हणून घोषित केले. फक्त एका यहूदाच्या घराण्याने तेवढा दावीदाच्या घराण्याला आपला पठिंबा दिला.

2 राजे 11:17

यहोयादाने नंतर परमेश्वर, राजा आणि लोक यांच्यात करार केला. राजा आणि लोक या दोघांवरही परमेश्वराची सत्ता आहे असे त्या करारात होते. यहोयादाने या खेरीज राजा आणि लोक यांच्यातही एक करार केला. राजाची लोकांबाबत असलेली कर्तव्ये त्यात होती. तसेच लोकांनी राजाचे आज्ञापालन आणि अनुयायित्व करावे असे ही त्यात म्हटले होते.

2 राजे 14:5

राज्यावर त्याची चांगली पकड असातानाच, आपल्या वडीलांचे मारेकरी असलेल्या अधिकाऱ्यांचा त्याने वध केला.

2 राजे 14:21

मग यहूदाच्या सर्व लोकांनी अजऱ्याला राजा केले. अजऱ्या तेव्हा सोळा वर्षांचा होता.

2 राजे 22:1

योशीया राज्य करु लागला तेव्हा आठ वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये एकतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव यदीदा. ती बसकथमधील अदाया याची मुलगी.

2 इतिहास 22:1

यहोरामच्या जागी यरुशलेमच्या लोकांनी यहोरामचा सर्वांत धाकटा मुलगा अहज्य याला राजा केले. यहोरामच्या छावणीवर हल्ला करायला आलेल्या अरबांबरोबर जे लोक आले होते त्यांनी यहोरामच्या इतर सर्व थोरल्या मुलांना मारुन टाकल्यामुळे यहूदात अहज्या राज्य करु लागला.

2 इतिहास 26:1

अमस्याचा मुलगा उज्जीया याला यहूदाच्या लोकांनी गादीवर बसवले. उज्जीया तेव्हा सोळा वर्षांचा होता.

2 इतिहास 33:25

पण राजा आमोन विरुध्द कारस्थान करणाऱ्यांचा यहूदी लोकांनी काटा काढला. मग आमोनचा मुलगा योशीया याला लोकांनी राजा केले.

Interlinear

Choose Theme