Home Bibles 2 राजे 14:21 · मराठी बायबल
2 राजे 14:21 · मराठी बायबल

मग यहूदाच्या सर्व लोकांनी अजऱ्याला राजा केले. अजऱ्या तेव्हा सोळा वर्षांचा होता.

Cross references

2 राजे 15:1

इस्राएलचा राजा यराबाम याच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदाचा राजा अमस्या याचा मुलगा अजऱ्या राजा झाला.

2 राजे 15:13

याबेशाचा मुलगा शल्लूम इस्राएलचा राजा झाला तेव्हा उज्जीया यहूदाचा राजा झाल्याला एकोणचाळिसावे वर्ष चालू होते. शल्लूमने शोमरोनमध्ये एक महिना राज्य केले.

2 राजे 21:24

आणि ज्यांनी आमोनशी फितुरी केली त्या सेवकांना देशातील लोकांनी जिवे मारले. मग आमोनचा मुलगा योशीया याला लोकांनी राजा केले.

1 इतिहास 3:12

योवाशचा मुलगा अमस्या, अमस्याचा मुलगा अजऱ्या, त्याचा मुलगा योथाम.

2 इतिहास 26:1

अमस्याचा मुलगा उज्जीया याला यहूदाच्या लोकांनी गादीवर बसवले. उज्जीया तेव्हा सोळा वर्षांचा होता.

मत्तय 1:8

आसा यहोशाफाटाचा पिता होता. यहोशाफाट योरामाचा पिता होता. योराम उज्जीयाचा पिता होता.

Interlinear

Choose Theme