Home Bibles 2 करिंथकरांस 4:13 · मराठी बायबल
2 करिंथकरांस 4:13 · मराठी बायबल

असे लिहिले आहे: “मी विश्वास ठेवला; म्हणून मी बोललो आहे.” विश्वासच्या त्याच आत्म्याने आम्हीसुद्धा विश्वास ठेवतो आणि म्हणून बोलतो.

Cross references

स्तोत्रसंहिता 116:10

“माझा सत्यानाश झाला” असे मी म्हणालो तरी मी विश्वास ठेवणे चालूच ठेवले.

नीतिसूत्रे 21:28

जो माणूस खोटे बोलतो त्याचा सर्वनाश होतो. जो कोणी ते खोटे बोलणे ऐकेल त्याचा पण नाश होईल.

प्रेषितांचीं कृत्यें 15:11

आम्ही असा विश्वास धरतो की, आम्ही आणि हे लोक प्रभु येशूच्या कृपेमुळे तारले जाणार आहोत.”

रोमकरांस 1:12

म्हणजे जोपर्यंत मी तुमच्यामध्ये आहे तोपर्यंत आपण एकमेकांना विश्वासामध्ये मदत करु. माझ्या विश्वासामुळे तुम्हांला व तुमच्या विश्वासामुळे मला फायदा होईल.

1 करिंथकरांस 12:9

कोणाला त्याच आत्म्याने विश्वास व दुसऱ्याला फक्त त्याचा एका आत्म्याद्वारे बरे करण्याचे दान दिले आहे.

2 करिंथकरांस 3:12

म्हणून आम्हांला अशी आशा असल्यामुळे, आम्ही फार धीट आहोत.

इब्री लोकांस 11:1

आता विश्वास म्हणजे, आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री, म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल भरंवसा असणे.

2 पेत्र 1:1

ख्रिस्त येशूचा दास व प्रेषित असलेल्या शिमोन पेत्राकडून,देवाकडून, ज्यांना तारणारा येशू ख्रिस्त याच्या द्वारे, मौल्यावान विश्वास आमच्या बरोबरीनेच मिळाला आहे अशांना,

Interlinear

Choose Theme