म्हणजे जोपर्यंत मी तुमच्यामध्ये आहे तोपर्यंत आपण एकमेकांना विश्वासामध्ये मदत करु. माझ्या विश्वासामुळे तुम्हांला व तुमच्या विश्वासामुळे मला फायदा होईल.
Cross references
बर्णबा चांगला मनुष्य होता. तो पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्णपणे भरलेला होता. जेव्हा बर्णबा अंत्युखियाला गेला, तेव्हा त्याने पाहिले की, देवाने या लोकांना खूपच आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे बर्णबाला खूप आनंद झाला. अंत्युखियातील सर्व विश्वासणाऱ्यांना त्याने उत्तेजन दिले, त्याने त्यांना सांगितले, “कधीही तुमचा विश्वास गमावू नका. नेहमी प्रभूची आज्ञा अंत:करणापासून पाळा.” पुष्कळ लोक खिस्ताचे अनुयायी झाले.
जेव्हा मी स्पेनला जाईल तेव्हा तुम्हांला भेटण्याचा विचार करीत आहे व तुमच्याविषयी माझे मन भरल्यावर माझ्या त्या प्रवासात तुम्ही मला मदत कराल अशी आशा आहे.
यासाठी की, देवाच्या इच्छेने मी तुम्हांकडे आनंदाने यावे आणि तुम्हांबरोबर ताजेतवाने व्हावे.
म्हणून मी असा निश्चय केला की, मी पुन्हा तुमची दु:खदायक अशी भेठ घेणार नाही.
मला तुमच्याविषयी मोठा विश्वास वाटतो, मला तुमच्याविषयी खूप अभिमान वाटतो, तुमच्या बाबतीत मी अधिक उत्तेजित झालो आहे. अनेक त्रास झाले तरी आमच्या सर्व त्रासात आमच्या आनंदाला उधाण आले आहे.
यामुळे आम्हास उत्तेजन मिळाले.आमच्या स्वत:च्या उत्तेजनाशिवाय आणखी आम्ही विशेषत: तीताला आनंदीत पाहून आम्हांला आनंद झाला कारण त्याचा आत्मा तुम्हा सर्वांमुळे ताजातवाना झाला आहे.
एक प्रभु, एक विश्वास, एक बाप्तिस्मा,
बंधूंनो, आमच्यासाठी, आम्ही तुमच्यापासून थोड्या वेळासाठी वेगळे झालो होतो. आम्ही शरीराने वेगळे झालो होतो, विचाराने नाही आणि आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी फार अधीर झालो होतो. आणि तुम्हांला भेटण्याची फार इच्छा होती.
म्हणून आमच्या सर्व अडचणीत व त्रासात बंधूंनो, तुमच्याविषयी आम्ही उत्तेजित झालो याला कारम म्हणजे तुमचा विश्वास.
माझ्यासाठी तू ढाळलेल्या अश्रूंची आठवण करताना तुला भेटण्याची आतुरतेने वाट पाहतो. यासाठी की मी आनंदाने भरूने जावे.
विश्वासातील माझा खरा मुलगा तीत याला मी लिहीत आहे. देव पिता व ख्रिस्त येशू आपला तारणारा याजकडून तुला कृपा, दया व शाति असो.
ख्रिस्त येशूचा दास व प्रेषित असलेल्या शिमोन पेत्राकडून,देवाकडून, ज्यांना तारणारा येशू ख्रिस्त याच्या द्वारे, मौल्यावान विश्वास आमच्या बरोबरीनेच मिळाला आहे अशांना,
पित्याने आपल्याला दिलेल्या आज्ञेप्रमाणे तुमची काही मुले सत्यात चालतात असे मला दिसून आले म्हणून मला फारआनंद झाला.
जेव्हा काही बंधु आले आणि सत्यात तूसातत्याने कसे चालतोस याविषयी त्यांनी साक्ष दिली आणि तू सत्याविषयीच्या विश्वासूपणाबद्दल मला सांगितले तेव्हा मलाफार आनंद झाला.
प्रिय मित्रांनो, जरी मली तुम्हांला आपल्या समाईक तारणाविषयी लिहिण्याची आतुरतेने तयारी करीत होतो तरी एकागोष्टीविषयी मला लिहावेसे वाटते. ते म्हणजे देवाने आपल्या संतांना, एकदा दिलेला विश्वास टिकविण्यासाठी लढत राहा.