Home Bibles 2 करिंथकरांस 4:12 · मराठी बायबल
2 करिंथकरांस 4:12 · मराठी बायबल

म्हणून मग, आमच्यामध्ये मृत्यू काम करीत आहे, पण तुमच्यामध्ये जीवन काम करीत आहे.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 20:24

मी माइया जीवनाविषयी काळजी करीत नाही. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे. प्रभु येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे - ते काम म्हणजे- देवाच्या कृपेबद्दल (दयाळूपणबद्दल) ची सुवार्ता लोकांना सांगितली पाहिजे.

1 करिंथकरांस 4:10

आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये किती हुशार आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही किती बलवान आहात! तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही तुच्छ आहोत!

2 करिंथकरांस 12:15

म्हणून मी फार आनंदाने माइयाकडे जे काही आहे, ते तुमच्यासाठी खर्च करीन आणि स्वत:देखील खर्ची पडेन. जर मी तुमच्यावर अधिक प्रेम करतो तर तुम्ही माझ्यावर कमी प्रेम कराल?

2 करिंथकरांस 13:9

जेव्हा आम्ही अशक्त आहो आणि तुम्ही शक्तीमान आहा, तेव्हा आम्ही आनंद करतो. आणि आम्ही प्रार्थनाही करतो, मी अशी की, तुम्ही पूर्ण व्हावे.

फिलिप्पैकरांस 2:17

तुमच्या यज्ञार्पणासमवेत तसेच तुमच्या विश्वासाच्या सेवेसमवेत जरी मी अर्पिला गेलो तरी ते आनंदाने करतो आणि तुमच्या समवेत आनंदी बनतो.

फिलिप्पैकरांस 2:30

त्याने त्याचे जीवन धोक्यात घातले, यासाठी की, माझी सेवा करण्यात तुमच्या जी उणीव होती ती भरुन काढावी.

1 योहान 3:16

अशा रीतीने ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वत:चा जीव दिला. यामुळे प्रेम काय आहे तेआपल्याला समजते. म्हणून आपण देखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे.

Interlinear

Choose Theme