Home Bibles 2 इतिहास 6:33 · मराठी बायबल
2 इतिहास 6:33 · मराठी बायबल

तू ती स्वर्गातून ऐक. त्याची मागणी पुरव. म्हणजे इस्राएल लोकांप्रमाणेच पृथ्वीवरील इतर लोकांनाही तुझ्या नावाचा महिमा कळेल आणि त्यांना तुझ्याविषयी आदर वाटेल. हे मी बांधलेले मंदिर तुझ्या नावाचे आहे हे पृथ्वीवरील सर्व लोकांना कळेल.

Cross references

गणना 6:27

मग परमेश्वर म्हणाला, “इस्राएल लोकांना आशीर्वाद देताना अहरोन व त्याच्या मुलांनी अशा प्रकारे माझ्या नांवाचा उपयोग करावा; म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”

1 शमुवेल 17:46

आज आमचा देव तुझा पराभव करील. मी तुला ठार करीन. तुझे मुंडके छाटीन आणि धड पशुपक्ष्यांना खायला टाकीन. सगळ्या पलिष्ट्यांची आम्ही अशीच अवस्था करुन टाकू. मग इस्राएलमधील परमेश्वराचे अस्तित्व सगळ्या जगाला कळेल.

1 राजे 8:16

“माझ्या इस्राएली प्रजेला मी मिसरमधून बाहेर आणले. पण या वंशातील कुठलेही नगर मी अजून माझे नाव राखण्यासाठी माझे मंदिर उभारण्यासाठी निवडले नाही. तसेच इस्राएल लोकांचा नेता म्हणूनही अजून कोणाची निवड केली नाही. पण आता माझा जेथे सन्मान होईल असे यरुशलेम हे नगर मी निवडले आहे आणि इस्राएल लोकांचा अधिपती म्हणून मी दावीदाची निवड केली आहे.’

2 राजे 19:19

तेव्हा परमेश्वर देवा आता आम्हाला या राजापासून वाचव. म्हणजे तूच खरा परमेश्वर आहेस हे जगातील सर्व राज्यांना कळेल.”

2 इतिहास 7:14

आणि अशावेळी लोकांनी नम्र होऊन माझा धावा करुन माझ्या दर्शनाची इच्छा बाळगली, दुराचाराचा त्याग केला तर मी स्वार्गातून त्यांच्या हाकेला ओ देईन. त्यांना त्यांच्या पापाची क्षम करीन आणि त्यांची भूमी संकटमुक्त करीन.

स्तोत्रसंहिता 22:27

दूरदूरच्या परदेशातील लोकांना परमेश्वराची आठवण येवो. आणि ते परमेश्वराकडे परत येवोत. सगळ्या परक्या देशांतील लोक परमेश्वराची उपासना करोत.

स्तोत्रसंहिता 46:10

देव म्हणतो, “शांत राहा आणि मी देव आहे हे लक्षात घ्या. मी राष्ट्रांचा पराभव करतो व जगाला ताब्यात ठेवतो.”

स्तोत्रसंहिता 67:2

देवा, पृथ्वीवरील प्रत्येक माणूस तुझ्या मार्गाविषयी समजून घेईल अशी मी आशा करतो. तू लोकांना कसा तारतोस ते प्रत्येक देशाला बघू दे.

स्तोत्रसंहिता 86:9

प्रभु तूच प्रत्येकाला निर्माण केलेत. ते सर्व येतील आणि तुझी उपासना करतील आणि तुझ्या नावाला मान देतील अशी मी आशा करतो.

स्तोत्रसंहिता 138:4

परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझे बोलणे ऐकतील तेव्हा ते तुझी स्तुती करतील.

यशया 11:10

त्या वेळेला इशायाच्या घराण्यात एक विशेष व्यक्ती असेल ती व्यक्ती ध्वजाप्रमाणे असेल हा “ध्वज” सर्व राष्ट्रांना त्याच्याभोवती जमण्याचे आवाहन करील. सर्व राष्ट्रे, त्यांनी करायच्या कार्याबद्दल ह्या ‘ध्वजाकडे’ विचारणा करतील तो जेथे असेल तेथे वैभव नांदेल.

यशया 49:6

“तू माझा फार महत्वाचा सेवक आहेस. इस्राएलचे लोक कैदी आहेत. पण त्यांना माझ्याकडे परत आणले जाईल. याकोबच्या वंशजांचा गोतावळा माझ्याकडे परत येईल. पण तुझे काम दुसरेच आहे, ते ह्या कामा पेक्षा महत्वाचे आहे. मी तुला सर्व राष्ट्रांना प्रकाश देणारा दिवा करीन. जगातील सर्व माणसांचे रक्षण करण्याचा माझा मार्ग तू होशील.”

यशया 54:1

स्त्रिये, सुखी हो. तुला मुले नाहीत. पण तू सुखी असावेस. परमेश्वर म्हणतो, “एकट्या असणाऱ्या बाईला.नवरा असणाऱ्या बाईपेक्षा जास्त मुले होतील.”

यिर्मया 10:7

परमेश्वर, प्रत्येक माणसाने तुझा आदर केला पाहिजे. तू सर्व राष्ट्रांचा राजा आहेस. म्हणूनच सर्वाना आदरणीय आहेस त्या राष्ट्रांमध्ये काही शहाणी माणसे जरुर आहेत पण तुझ्या इतके सुज्ञ कोणीही नाही.

प्रकटीकरण 11:15

सातव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाले. ते आवाज म्हणाले:“जगाचे राज्य आता आमच्या प्रभुचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे. आणि तो अनंतकाळपर्यंत राज्य करील.”

Interlinear

Choose Theme