Home Bibles यिर्मया 10:7 · मराठी बायबल
यिर्मया 10:7 · मराठी बायबल

परमेश्वर, प्रत्येक माणसाने तुझा आदर केला पाहिजे. तू सर्व राष्ट्रांचा राजा आहेस. म्हणूनच सर्वाना आदरणीय आहेस त्या राष्ट्रांमध्ये काही शहाणी माणसे जरुर आहेत पण तुझ्या इतके सुज्ञ कोणीही नाही.

Cross references

यहोशवा 4:24

आपला परमेश्वर अतिशय प्रतापी आहे हे जाणून येथील लोकांना त्याचा धाक वाटावा म्हणून तुमच्या परमेश्वर देवाने असे केले.”

2 राजे 17:39

फक्त परमेश्वर देवालाच भजा. तरच तो तुम्हाला सर्व संकटांतून सोडवील.”

1 इतिहास 16:25

परमेश्वर थोर आहे. त्याची स्तुती केली पाजिजे इतर दैवतांपेक्षा परमेश्वराचा धाक अधिक आहे.

ईयोब 37:23

तो सर्वशक्तिमान देव महान आहे. आपण त्याला समजू शकत नाही. तो सामर्थ्यवान आहे. परंतु तो आपल्याशी चांगला आणि न्यायाने वागतो. देवाला आपल्याला त्रास द्यायची इच्छा नसते.

स्तोत्रसंहिता 22:28

का? कराण परमेश्वराच राजा आहे तो सगळ्या देशांवर राज्य करतो.

स्तोत्रसंहिता 47:3

त्याने आपल्याला दुसऱ्या लोकांचा पराभव करायला मदत केली. त्याने ते देश आपल्या अधिपत्याखाली आणले.

स्तोत्रसंहिता 72:11

सागळ्या राजांना आमच्या राजासमोर मुजरे करु दे सगळी राष्ट्रे त्याच्या सेवेत राहू दे.

स्तोत्रसंहिता 76:7

देवा, तू भयकारी आहेस. तू रागावतोस तेव्हा तुझ्याविरुध्द कुणीही उभा राहू शकत नाही.

स्तोत्रसंहिता 86:8

देवा, इथे तुझ्यासारखा कुणीही नाही. तू जे केलेस ते कोणीही करु शकणार नाही.

स्तोत्रसंहिता 86:9

प्रभु तूच प्रत्येकाला निर्माण केलेत. ते सर्व येतील आणि तुझी उपासना करतील आणि तुझ्या नावाला मान देतील अशी मी आशा करतो.

स्तोत्रसंहिता 89:6

स्वर्गातला कोणीही परमेश्वरा समान नाही. “देवा” पैकी कुणाचीही परमेश्वराशील तुलना होऊ शकत नाही.

स्तोत्रसंहिता 147:5

आपला प्रभु खूप मोठा आहे. तो फार शक्तीवान आहे. त्याला माहीत असलेल्या गोष्टींना मर्यादा नाही.

यशया 2:4

नंतर सर्व देशांतील लोकांचा न्याय देवच करील. देव माणसा-माणसांतील वाद मिटवील. लोक लढण्यासाठी शस्त्र वापरणार नाहीत. लोक भाल्यांचे कोयते करतील. लोक एकमेकांविरूध्द लढणार नाहीत. इत:पर युध्दाचे शिक्षण दिले जाणार नाही.

यिर्मया 5:22

खरोखर तुम्हाला माझी भिती वाटते.” हा परमेश्वराचा संदेश आहे.“माझ्यापुढे तुम्ही भीतीने थरथर कापावे. समुद्राला सीमा असावी म्हणून समुद्रकिनारे निर्माण करणारा मी एकमेव आहे. पाणी अखंड जागच्या जागी राहावे म्हणून मी असे केले. लाटा कधी किनाऱ्यावर आक्रमण करतात. पण त्या किनाऱ्याचा नाश करीत नाहीत. लाटा गर्जना करीत कधी कधी आत येतात, पण त्या किनाऱ्याच्या बाहेर जाऊ शकत नाहीत.

यिर्मया 10:6

परमेश्वर तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. तू महान आहेस. तुझ्या नावातच मोठेपण व सामर्थ्य आहे.

जखऱ्या 2:11

त्या वेळी पुष्कळ राष्ट्रांमधील लोक माझ्याकडे येतील. ती माझी माणसे होतील. मी तुझ्या नगरीत राहीन.” मग मला सर्व शक्तिमान परमेश्वराने पाठविले असल्याचे तुला समजेल.

मलाखी 1:11

“सर्वजगातील लोक माझ्या नावाचा मान राखतात. सर्व जगातील लोक मला उत्तम भेटी आणतात. भेट म्हणून उत्तम धूप माझ्यापुढे जाळतात. का? कारण त्या सर्व लोकांना माझ्या नावाचे महत्व वाटते.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.

लूक 12:5

तुम्ही कोणाची भीति बाळगावी हे मी तुम्हांला सांगतो. तुम्हांला ठार मारल्यांनतर तुम्हांस नरकात टाकून देण्यास जो समर्थ आहे, त्याची भीति धरा. होय, मी तुम्हांस सांगतो त्यालाच भ्या.

1 करिंथकरांस 1:19

कारण पवित्र शास्त्रांत असे लिहिले आहे,“शहाण्यांचे शहाणपण मी नष्ट करीन, आणि बुद्धिवंतांची बुध्दि मी बाजूला करीन.”

प्रकटीकरण 11:15

सातव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाले. ते आवाज म्हणाले:“जगाचे राज्य आता आमच्या प्रभुचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे. आणि तो अनंतकाळपर्यंत राज्य करील.”

प्रकटीकरण 15:4

हे प्रभु, सर्व लोक तुला घाबरतील सर्व लोक तुझ्या नावाची स्तुति करतील. फक्त तूच पवित्र आहेस सर्व लोक येऊन तुझीउपासना करतील कारण तुझी नीतीमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.”

Interlinear

Choose Theme