याशिवाय फुले, दिवे आणि निखारे उचलण्याचे चिमटे शुध्द सोन्याचे होते.
Cross references
“मग तू एक दीपवृक्ष तयार कर. शुद्ध सोने वापर व ते ठोकून बैठक व दांडा घडव शुद्ध सोन्यापासून फुले, कव्व्या व पाकळ्या तयार कर. व हे सर्व एकत्र जोडून एकसंध कर.
दिवे मालवण्याचे चिमटे व त्यांच्या त्यांच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची असावीत.
दीपवृक्षाच्या दांड्याला आणखी चार, बदामाच्या फुलांसारखी फुले, कव्व्या पाकव्व्या होत्या.
हा भाग सुध्दा गंधसरुने मढवलेला होता. त्यातून भिंनीच्या दगडाचे नखभरही दर्शन होत नव्हते. या लाकडावर फुले आणि रानकाकड्या यांचे कोरीवकाम केलेले होते.
दर्शनी भाग आणि गाभारा यांच्या भिंतींवरही करुबांची चित्रे कोरलेलही होती. खजुरीची झाडे आणि फुलेही कोरली होती.
कारागिरांनी दोन दरवाजे केले आणि प्रत्येक दार दोन झडपांचे होते त्यामुळे ते दुमडले जात असे. त्यावरही पुन्हा करुब देवदूत, खजुरीची झाडे, फुले यांचे कोरीव काम असून ती दारे सोन्याने आच्छादली होती.
या पितळी गंगाळाची जाडी 3 इंच होती. त्याची कड उमललेल्या कमलपुष्पासारखी होती. त्यात 17,500 गँलन पाणी मावू शकत असे.