Home Bibles निर्गम 25:38 · मराठी बायबल
निर्गम 25:38 · मराठी बायबल

दिवे मालवण्याचे चिमटे व त्यांच्या त्यांच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची असावीत.

Cross references

निर्गम 37:23

ह्या दीपावृक्षावर त्याने सात दिवे बनविले; मग त्याने दिवे मालवण्याचे चिमटे व त्यांच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची बनविली.

गणना 4:9

मग त्यांनी दीपवृक्ष आणि त्यावरील दिवे, तसेच दिवे सतत तेवत ठेवण्याकरिता लागणारी सर्व उपकरणे चिमटे, ताटल्या आणि दिव्यासाठी लागणाऱ्या तेलाची सर्व पात्रे ही सर्व निळ्या कापडाने झाकावी.

2 राजे 12:13

लोक परमेश्वराच्या मंदिरासाठी पैसे देत. पण याजकांना ते चांदीची उपकरणी, कातऱ्या, वाडगे, कर्णे, सोन्या-चांदीची तबके यासाठी वापरता येत नव्हते, तर कारागिरांनाच ते पैसे दिले जात. त्या पैशाने ते मंदिराची दुरुस्ती करत.

2 राजे 25:14

इतर पात्रे, फावडी, वाती कापण्याच्या कात्र्या, पळ्या, पितळी थाळ्या ही परमेश्वराच्या मंदिरातली सर्व उपकरणेही त्यांनी घेतली.

2 इतिहास 4:21

याशिवाय फुले, दिवे आणि निखारे उचलण्याचे चिमटे शुध्द सोन्याचे होते.

यशया 6:6

तेथे वेदीवर अग्नी प्रज्वलित केलेला होता एका सराफ देवदूताने चिमट्याने त्यातील निखारा उचलला. सराफ देवदूत तो निखारा घेऊन माझ्याकडे उडत आला.

Interlinear

Choose Theme