Home Bibles 2 इतिहास 36:12 · मराठी बायबल
2 इतिहास 36:12 · मराठी बायबल

परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य असे त्याचे असे. परमेश्वराचे आदेश संदेष्टा यिर्मया याच्याकडून येत असत.त्याच्यापुढेही सिदकीया विनम्र झाला नाही आणि यिर्मयाचे त्याने ऐकले नाही.

Cross references

निर्गम 10:3

मग मोशे व अहरोन फारोकडे गेले. त्यांनी त्याला सांगितले, “इस्राएल लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘अजून किती दिवस तू माझे ऐकणार नाहीस? माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांना जाऊ दे.

2 इतिहास 32:26

पण हे लोक आणि हिज्कीया यांचे ह्दयपरिवर्तन झाले आणि त्यांची वर्तणूक बदलली. त्यांच्यात नम्रता आली. त्यामुळे हिज्कीयाच्या हयातीत परमेश्वराचा रोष त्यांच्यावर ओढवला नाही.

2 इतिहास 33:12

मनश्शेचे हाल झाले तेव्हा त्याने परमेश्वर देवाची करुणा भाकली. त्याच्या पूर्वजांच्या देवासमोर मनश्शे नम्र झाला.

2 इतिहास 33:19

मनश्शेची प्रार्थना आणि परमेश्वराला त्याचे गाऱ्हणे ऐकून करुणा वाटणे हे ‘द्रष्टयांच्या बखरीत आहे. मनश्शेला उपरती होण्यापूर्वीची त्याची पापे व दुर्वर्तने, उंच स्थाने व अशेरा स्तंभ जिथे उभारले ती स्थाने याचेही तपशील याच बखरीत आहेत.

2 इतिहास 33:23

पुढे त्याचे वडील मनश्शे जसे परमेश्वराला नम्रपणे शरण गेले तसा तो गेला नाही. उलट त्याची दुष्कृत्ये वाढतच चालली.

2 इतिहास 35:22

पण योशीया मागे हटला नाही. त्याने नखोला तोंड द्यायचे ठरवले. आणि वेष पालटून तो लढाईत उतरला. आज्ञेविषयी नखोने जे सांगितले ते योशीयाने ऐकले नाही. तो मागिद्दोच्या खोऱ्यात युध्दासाठी सज्ज झाला.

यिर्मया 21:1

यहूदाचा राजा सिद्कीया याने पशूहरला आणि सफन्या नावाच्या याजकाला यिर्मयाकडे पाठविले. त्याच वेळी यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. पशहूर हा मल्कीयाचा मुलगा होता, तर सफन्या मासेचा मुलगा होता. पशहूर व सफन्या ह्यांनी यिर्मयासाठी निरोप आणला.

यिर्मया 27:12

“‘यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला मी असाच संदेश दिला. मी म्हणालो, “सिद्कीया, तुला तुझी मान बाबेलच्या राजाच्या जोखडात अडकवलीच पाहिजे आणि त्याचा हुकूम मानला पाहिजे. तू, बाबेलचा राजा आणि त्याची प्रजा, ह्यांची सेवा केलीस, तरच तू जगशील.

यिर्मया 34:2

संदेश असा होता, परमेश्वर इस्राएलचा देव म्हणतो, “यिर्मया, यहूदाचा राजा सिद्कीया याच्याकडे जा व पुढील निरोप दे. ‘सिद्कीया, परमेश्वर असे म्हणतो की मी लवकरच यरुशलेम बाबेलच्या राजाच्या ताब्यात देईन व ती तो भस्मसात करील.

यिर्मया 37:2

पण, परमेश्वराने यिर्मया या संदेष्ट्यातर्फे दिलेल्या संदेशाकडे सिद्कीयाने लक्ष दिले नाही. सिद्कीयाच्या सेवकांनी व यहूदाच्या लोकांनीही परमेश्वराच्या संदेशांकडे दुर्लक्षच केले.

यिर्मया 38:14

नंतर सिद्कीया राजाने यिर्मयाला बोलवायला कोणाला तरी पाठविले. त्याने यिर्मयाला परमेश्वराच्या मंदिराच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराजवळ आणविले मग राजा म्हणाला, “यिर्मया, मी तुला काही विचारतो माझ्यापासून काही लपवू नकोस. मला प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे सांग!”

यिर्मया 38:21

पण तू बाबेलच्या राजाला शरण जाण्यास नकार दिलास, तर काय होईल, हे परमेश्वराने मला दाखविले आहे. परमेश्वराने मला पुढीलप्रमाणे सांगितले.

दानीएल 5:22

पण बेलशस्सर, तुला हे सर्व ठाऊकच आहे तू नबुखद्नेस्सरचा नातूचआहेस पण अजूनही तू नम्र झाला नाहीस.

याकोब 4:10

तुम्ही प्रभूसमोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हांला उच्च स्थान देईल.

1 पेत्र 5:6

देवाने योग्य वेळी तुम्हांस उंच करावे यासाठी देवाच्या बलशाली हाताखाली लीनतेने राहा.

Interlinear

Choose Theme