Home Bibles याकोब 4:10 · मराठी बायबल
याकोब 4:10 · मराठी बायबल

तुम्ही प्रभूसमोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हांला उच्च स्थान देईल.

Cross references

1 शमुवेल 2:9

सज्जनांना तो आधार देतो. त्यांना लटपटू देत नाही. पण दुर्जनांचा संहार करतो. त्यांना गर्तेत ढकलतो दुर्जनांचे बळ अशा वेळी कुचकामी ठरते.

ईयोब 22:29

देव अहंकारी लोकांना मान खाली घालायला लावतो. परंतु विनम्र लोकांना तो मदत करतो.

स्तोत्रसंहिता 27:6

माझ्या शत्रूंनी माझ्या भोवती वेढा घातला आहे. परंतु त्यांचा पराभव करायला परमेश्वर मला मदत करील नंतर मी त्याच्या डेऱ्यात बळी अर्पण करीन. मी बळी देताना आनंदाने ओरडेन. मी परमेश्वराला आदर दाखविण्यासाठी गाणीगाईन, वाद्ये वाजवीन.

स्तोत्रसंहिता 28:9

देवा, तुझ्या लोकांना वाचव जे तुझे आहेत त्यांना आशीर्वाद दे. त्याना वाट दाखव व त्यांना सदैव क्षमा कर, त्यांना उचलून घे.

स्तोत्रसंहिता 30:1

परमेश्वरा, तू मला माझ्या संकटांतून वर उचललेस. तू माझ्या शत्रूंना माझा पराभव करु दिला नाहीस आणि त्यांना मला उद्देशून हसण्याची संधी दिली नाहीस म्हणून मी तुला मान देईन.

स्तोत्रसंहिता 113:7

देव गरीब लोकांना घाणीतून वर उचलतो. देव भिकाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगातून काढतो.

स्तोत्रसंहिता 147:6

परमेश्वर नम्र लोकांना मदत करतो. परंतु तो वाईट लोकांना अडचणीत टाकतो.

मत्तय 23:12

जो स्वत:ला मोठा समजेल त्याला कमी लेखले जाईल. स्वत:ला लहान समजणारा प्रत्येक जण मोठा गणला जाईल.

लूक 1:52

सत्ताधीशांना त्याने त्यांच्या सिंहासनावरुन खाली आणले आहे, आणि नम्र जनांना त्याने उंच केले आहे.

लूक 14:11

कारण जो कोणी स्वत:ला उच्च करितो त्याला लीन केले जाईल व जो स्वत:ला लीन करील त्याला उच्च केले जाईल.”

लूक 18:14

मी तुम्हांला सांगतो हा मनुष्य, त्या दुसऱ्याया माणसापेक्षा नितीमान ठरुन घरी गेला. कारण जो कोणी स्वत:ला उंच करतो त्याला नीच केले जाईल आणि जो कोणी स्वत:ला नीच करतो त्याला उंच केले जाईल.”

याकोब 4:6

पण देव आम्हांवर त्याहूनही मोठी कृपा करतो. त्यासाठीच पवित्र शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठाचा विरोध करतो, पण नम्र जनांवर तो दया करतो.”

1 पेत्र 5:6

देवाने योग्य वेळी तुम्हांस उंच करावे यासाठी देवाच्या बलशाली हाताखाली लीनतेने राहा.

Interlinear

Choose Theme