सिद्कीया येहूदाचा राजा झाला तोव्हा एकवीस वर्षांचा होता.त्याने यरुशले ममध्ये अकार वर्षे राज्य केले .
Cross references
सिद्कीया राज्य करु लागला तेव्हा एकवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर अकरा वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव हमूटल. ती लिब्ना येथील यिर्मया याची मुलगी.
सिद्कीयाने बाबेलच्या राजाविरुध्द बंड केले आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचे त्याने नाकारले. त्यामुळे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्या सैन्यासह यरुशलेमवर चाल करुन गेला. सिद्कीया राज्यावर आल्याचे ते नववे वर्ष, दहावा महिना, दहावा दिवस होता. नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरुशलेमला वेढा देऊन लोकांची ये जा रोखली. मग त्याने नगराभोवती कचऱ्याचे अडसर निर्माण केले.
यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्यावर्षी हा संदेश आला. सिद्कीया योशीया राजाचा मुलगा होता.
यहूदाचा राजा सिद्कीया याच्या कारकिर्दींच्या चौथ्या वर्षाच्या पाचव्या महिन्यातहनन्या हा संदेष्टा माझ्याशी बोलला. हनन्या हा अज्जूरचा मुलगा होता. तो गिबोन गावचा रहिवासी होता. परमेश्वराच्या मंदिरात तो माझ्याशी बोलला. तेव्हा याजक व इतर सर्व लोक तेथे उपस्थित होते. हनन्या म्हणाला,
पण बाबेलमध्ये ज्यांना आणले गेले नाही, त्या तुमच्या आप्तांविषयी परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो. ह्या गोष्टी दावीदाच्या सिंहासनावर आता बसलेल्या राजासाठी व यरुशलेममध्ये अजूनही राहत असलेल्या लोकांसाठी आहेत.
पण, परमेश्वराने यिर्मया या संदेष्ट्यातर्फे दिलेल्या संदेशाकडे सिद्कीयाने लक्ष दिले नाही. सिद्कीयाच्या सेवकांनी व यहूदाच्या लोकांनीही परमेश्वराच्या संदेशांकडे दुर्लक्षच केले.
सिद्कीया त्याच्या वयाच्या 21व्या वर्षी यहूदाचा राजा झाला. त्याने 11 वर्षे यरुशलेमवर राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल. ती यिर्मयाची मुलगी होती. तिचे घराणे लिब्ना येथील होते.