Home Bibles 2 इतिहास 33:20 · मराठी बायबल
2 इतिहास 33:20 · मराठी बायबल

पुढे मनश्शे वारला व पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याच्या राजमहालातच लोकांनी त्याला पुरले. त्याच्या जागी त्याचा मुलगा आमोन राज्य करु लागला.

Cross references

2 राजे 21:18

मनश्शे मरण पावला आणि त्याचे आपल्या पूर्वजांच्या शेजारी दफन झाले. आपल्या घराच्या बगीच्यात त्याला पुरले. या बागेचे नाव “उज्जाची बाग” त्याच्या जागी त्याचा मुलगा आमोन राज्य करु लागला.

1 इतिहास 3:14

मनश्शेचा मुलगा आमोन, आमोनचा योशीया.

2 इतिहास 21:20

यहोराम सत्तेवर आला तेव्हा बत्तीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये आठ वर्षे राज्य केले. त्याच्या मृत्यूचे कोणालाही दु:ख झाले नाही. लोकांनी दावीदनगरातच त्याचे दफन केले, पण राजासाठी असलेल्या कबरीत नव्हे.

2 इतिहास 32:33

हिज्कीया मरण पावला आणि त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. दावीदाच्या वंशजांच्या कबरीपाशी डोंगरावर लोकांनी त्याचे दफन केले. हिज्कीया मरण पावला तेव्हा यहूदा आणि यरुशलेममधील लोकांनी त्याला सन्मानपूर्वक निरोप दिला. हिज्कीयाच्या जागी त्याचा मुलगा मनश्शे गादीवर आला.

2 इतिहास 33:21

आमोन विसाव्या वर्षी यहूदाचा राजा झाला. तो यरुशलेममध्ये दोन वर्षे गादीवर होता.

मत्तय 1:10

हिज्कीया मनश्शेचा पिता होता. मनश्शे आमोनचा पिता होता. आमोन योशीयाचा पिता होता.

Interlinear

Choose Theme