2 इतिहास 33:21 · मराठी बायबल
आमोन विसाव्या वर्षी यहूदाचा राजा झाला. तो यरुशलेममध्ये दोन वर्षे गादीवर होता.
Cross references
2 राजे 21:19
आमोन राज्य करु लागला तेव्हा बावीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर दोन वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव मशुल्लेमेथ ही यटबा येथील हारुस याची मुलगी.
2 इतिहास 33:1
मनश्शे यहूदाचा राजा झाला तेव्हा बारा वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये पंचावन्न वर्षे राज्य केले.
2 इतिहास 33:20
पुढे मनश्शे वारला व पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याच्या राजमहालातच लोकांनी त्याला पुरले. त्याच्या जागी त्याचा मुलगा आमोन राज्य करु लागला.
लूक 12:19
आणि मी माझ्या जिवाला म्हणेन, जिवा, तुझ्यासाठी पुष्कळ चांगल्या गोष्टी अनेक वर्षे पुरतील इतक्या आहेत. आराम कर, खा, पी आणि मजा कर.”
याकोब 4:13
ऐक, तू म्हणतोस, “आज किंवा उद्या आपण या शहरी किंवा त्या शहरी जाऊ व तेथे आपण एक वर्ष घालवू आणि आपण तेथे व्यापार करू व पैसा कमवू.”