मनश्शे मरण पावला आणि त्याचे आपल्या पूर्वजांच्या शेजारी दफन झाले. आपल्या घराच्या बगीच्यात त्याला पुरले. या बागेचे नाव “उज्जाची बाग” त्याच्या जागी त्याचा मुलगा आमोन राज्य करु लागला.
Cross references
आमोन राज्य करु लागला तेव्हा बावीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर दोन वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव मशुल्लेमेथ ही यटबा येथील हारुस याची मुलगी.
उज्जाच्या बागेत आमोनचे दफन करण्यात आले. आमोनचा मुलगा योशीया राजा झाला.
मनश्शेचा मुलगा आमोन, आमोनचा योशीया.
यहोराम सत्तेवर आला तेव्हा बत्तीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये आठ वर्षे राज्य केले. त्याच्या मृत्यूचे कोणालाही दु:ख झाले नाही. लोकांनी दावीदनगरातच त्याचे दफन केले, पण राजासाठी असलेल्या कबरीत नव्हे.
दावीदनगरात इतर राजांच्या कबरी शेजारीच त्याचे लोकांनी दफन केले. देवासाठी आणि त्याच्या मंदिरासाठी त्याने इस्राएलमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्या हयातीत केल्या म्हणून लोकांनी त्याचे या ठिकाणी दफन केले.
अरामी योवाशला घायाळ अवस्थेत सोडून गेले तेव्हा योवाशच्या सेवकांनीच त्याच्याविरुध्द कट केला. यहोयादा या याजकाच्या मुलाला, जखऱ्याला योवाशने मारल्यामुळे ते या कारस्थानाला प्रवृत्त झाले. योवाशला त्यांनी त्याच्या शय्येवरच ठार केले. दावीदनगरात लोकांनी त्याला मूठमाती दिली. पण राजांच्या दफन भूमीत त्याचे दफन केले नाही.
आहाज मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. यरुशलेम नगरात लोकांनी त्याला पुरले. पण इस्राएलच्या इतर राजांचे जेथे दफन झाले त्या जागी मात्र नव्हे. आहाजचा मुलगा हिज्कीया हा पुढे राजा झाला.
हिज्कीया मरण पावला आणि त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. दावीदाच्या वंशजांच्या कबरीपाशी डोंगरावर लोकांनी त्याचे दफन केले. हिज्कीया मरण पावला तेव्हा यहूदा आणि यरुशलेममधील लोकांनी त्याला सन्मानपूर्वक निरोप दिला. हिज्कीयाच्या जागी त्याचा मुलगा मनश्शे गादीवर आला.
पुढे मनश्शे वारला व पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याच्या राजमहालातच लोकांनी त्याला पुरले. त्याच्या जागी त्याचा मुलगा आमोन राज्य करु लागला.
एखाद्या गाढवाला पुरावे तसे यरुशलेममधील लोक यहोयाकीमचे दफन करतील. ते त्याचा मृत देह फरपटत नेऊन यरुशलेमच्या वेशीबाहेर फेकून देतील.