Home Bibles 2 इतिहास 19:4 · मराठी बायबल
2 इतिहास 19:4 · मराठी बायबल

यहोशाफाट यरुशलेममध्ये राहात असे, त्याने पुन्हा एकदा बैर - शेब्यापासून एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत फिरुन लोकांच्या भेटी घेतल्या. त्याने लोकांना पुन्हा एकदा त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याकडे वळवले.

Cross references

उत्पत्ति 21:33

अब्राहामाने बैर - शेबा येथे एक विशेष प्रकारचे झाड लावले, आणि त्याच जागी, जो निरंतर राहतो अशा परमेश्वराची प्रार्थना केली; आणि तो बराच काळ पलिष्ट्यांच्या देशात राहिला.

यहोशवा 17:15

यहोशवा त्यावर म्हणाला, “तुमची संख्या वाढली असेल तर मग त्या डोंगराळ प्रदेशात जा. सध्या ती जमीन परिज्जी व रेफाई यांच्या मालकीची आहे. पण एफ्राईमाचा डोंगराळ प्रदेश तुम्हाला अपुरा पडत असेल तर त्या जमिनीचा ताबा घ्या.”

शास्ते 19:1

त्या काळी इस्राएल लोकांवर कोणी राजा नव्हता. एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशात अगदी आडबाजूला एक लेवी राहात असे.यहूदातील बेथलहेम नगरातील एक बाई त्याची दासी म्हणून त्याच्याजवळ राहात असे.

शास्ते 20:1

तेव्हा इस्राएलमधील लोक मिस्पा येथे परमेश्वरासमोर गोळा झाले. गिलादमधील लोकांसह झाडून सर्व लोक हजर होते.

1 शमुवेल 7:3

शमुवेलने तेव्हा लोकांना सांगितले, “तुम्ही खरोखरच मन:पूर्वक परमेश्वराकडे वळला असाल तर इतर देव-देवता, अष्टरोथ यांना निग्रहाने दूर सारा. परमेश्वराचीच एकचित्ताने उपासना करा. केवळ त्याचीच सेवा करा. मग परमेश्वर तुमची पलिष्ट्यांच्या तावडीतून सोडवणूक करील.”

1 शमुवेल 7:15

शमुवेलने आयुष्यभर इस्राएलसाठी न्यायनिवाडा केला.

2 इतिहास 15:8

आसाला या शब्दांनी आणि ओबेद या संदेष्ट्याच्या संदेशाने धीर आला. त्याने यहूदा आणि बन्यामिनमधील अमंगळ मूर्ती हटवल्या. एफ्राइमचा जो डोंगराळ प्रदेश त्याने ताब्यात घेतला होता त्या प्रदेशातल्या गावांमधल्या मर्तिही काढून टाकल्या. मंदिराच्या प्रवेशद्वारातील परमेश्वराच्या वेदीची डागडुजी केली.

2 इतिहास 15:9

मग त्याने यहूदा आणि बन्यामिनमधील सर्व लोक तसेच एफ्राइम, मनश्शे व शिमोन वंशातील जे लोक इस्राएल राष्ट्रातून यहूदांत आले होते त्यांना एकत्र बोलावले. आसाचा देव परमेश्वर याची त्याला साथ आहे हे पाहून लोक मोठ्या संख्येने आले.

2 इतिहास 29:10

म्हणून मी, हा हिज्कीया, इस्राएलच्या परमेश्वर देवाशी करार करणार आहे. म्हणजे आपल्यावर त्याचा राग राहणार नाही.

मलाखी 4:6

एलीया पालकांना त्यांच्या मुलांजवळ व मुलांना त्यांच्या पालकांजवळ येण्यास मदत करील. हे घडलेच पाहिजे नाहीतर मी (देव) येईन आणि तुमच्या देशाचा संपूर्ण नाश करीन.”

मत्तय 25:16

ज्याला पाच थैल्या रुपये दिले होते त्याने त्याप्रमाणे काम करायला सुरूवात केली आणि आणखी पाच थैल्या रुपये त्याने मिळविळे.

लूक 1:17

योहान स्वत: देवापुढे चालेल, तो एलीयाप्रमाणे समर्थ होईल. एलीयाला जो आत्मा होता, तोच त्याला असेल. तो वडिलांची अंत:करणे त्याच्या मुलांकडे वळवील. आज्ञा न मानणाऱ्यांना तो धार्मिकतेकडे नेईल. प्रभुसाठी लोकांना तयार करण्यासाठी तो या गोष्टी करील.”

Interlinear

Choose Theme