Cross references
तेव्हा परमेश्वराने न्यायाधीश म्हणून, ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांची नेमणूक केली. हे नेते इस्राएलांचा ताबा घेणाऱ्या शत्रुंपासून त्यांची सुटका करीत.
अथनिएलावर परमेश्वराचा आत्मा आला आणि तो इस्राएल लोकांचा न्यायाधीश झाला. त्याने इस्राएली सैन्याला लढाईस नेले. परमेश्वराच्या मदतीने अथनिएल ने कुशन-रिशाथईमचा पराभव केला.
मग सर्व इस्राएल लोक मिस्पा येथे जमले. त्यांनी पाणी आणून परमेश्वरापुढे ओतले. मग त्यांच्या उपासाला सुरुवात झाली. अन्नापाणी वर्ज्य करुन त्यांनी परमेश्वरापुढे आपल्या पातकांची कबुली दिली. शमुवेल त्या वेळी इस्राएलमध्ये न्याय निवाडा करत असे.
शमुवेल सर्व इस्राएलांना उद्देशून म्हणाला, “मी सर्व काही तुमच्या म्हणण्याप्रमाणे केले आहे. तुमच्यावर राजा नेमला आहे.
“तेव्हा मग परमेश्वराने यरुबाबेल (गिदोन), बदान, इफताह आणि शमुवेल यांना पाठवून शत्रूंपासून तुमची सुटका केली. तेव्हा तुम्हाला स्वस्थता लाभली.
शमुवेल मरण पावला. तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून दुखवटा व्यक्त केला. शमुवेलचे दफन त्यांनी रामा येथील त्याच्या घराजवळ केले. नंतर दावीद पारानच्या वाळवंटाकडे गेला.
हे सर्व साधारणपणे चारशेपन्रास वर्षांत घडले.“त्यानंतर देवाने आपल्या लोकांना शास्ते (नेते) दिले. ते शमुवेल संदेष्टेयाच्या काळापर्यंत.