Home Bibles शास्ते 19:1 · मराठी बायबल
शास्ते 19:1 · मराठी बायबल

त्या काळी इस्राएल लोकांवर कोणी राजा नव्हता. एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशात अगदी आडबाजूला एक लेवी राहात असे.यहूदातील बेथलहेम नगरातील एक बाई त्याची दासी म्हणून त्याच्याजवळ राहात असे.

Cross references

उत्पत्ति 22:24

आणि त्याची स्त्रीगुलाम रेऊमा हिलाही त्याच्या पासून तेबाह, गहाम, लहश व माका हे चार मुलगे झाले.

उत्पत्ति 35:19

एक्राथ (म्हणजे बेथलहेम) गांवाला जाणाऱ्या वाटेजवळ राहेलीस पुरले

यहोशवा 24:30

तिम्नाथ सेरह या आपल्या वतनाच्या गावी त्याचे दफन करण्यात आले. गाश डोंगराच्या उत्तरेला एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात हे ठिकाण आहे.

यहोशवा 24:33

अहरोनाचा मुलगा एलाजार हाही मरण पावला. एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील गिबा येथे त्याचे दफन करण्यात आले. एलाजारचा पुत्र फिनहास याला गिबा हा प्रदेश मिळाला.

शास्ते 3:27

तो सेईरा येथे पोचला तेव्हा लगेच त्याने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले. इस्राएल लोकांनी तो आवाज ऐकला आणि ते खाली उतरले एहूद त्यांच्या पुढे निघाला.

शास्ते 12:8

मग बेथलहेममधील इब्सान याने न्यायाधीश म्हणून इस्राएल लोकांचे काम पाहिले.

शास्ते 17:1

एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशात मीखा नामक एक माणूस राहात होता.

शास्ते 17:6

(त्याकाळी इस्राएलांवर राजा नव्हता तेव्हा प्रत्येकजण आपल्याला योग्य वाटेल तसे करीत असे.)

शास्ते 17:7

बेथलहेम येथे यहूदा कुळामध्ये एक तरुण लेवी होता.

शास्ते 17:8

इतरत्र स्थायिक होण्याच्या विचाराने त्याने बेथलहेम सोडले. असाच प्रवास करत करत तो मीखाच्या घरी येऊन पोहोंचला. एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशातील मीखाच्या घरी तो आल्यावर

शास्ते 18:1

त्याकाळी इस्राएलवर कोणी राजा नव्हता. त्या सुमारास दान वंशातील लोक वस्ती करण्याच्या उद्देशाने जागा पाहात होते. त्यांना अजून स्वत:ची अशी भूमी नव्हती. इतर इस्राएलांप्रमाणे त्यांना त्यांचे वतन मिळाले नव्हते.

शास्ते 18:13

येथून पुढे ते प्रवास करत एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात मीखाच्या घरापाशी येऊन पोचले.

शास्ते 21:25

त्या काळी त्यांच्यावर कोणी राजा राज्य करत नव्हता. त्यामुळे ज्याला जे योग्य वाटेल ते तो करी.

2 शमुवेल 3:7

शौलची रिस्पा नामक उपपत्नी होती. ती अय्याची मुलगी. ईश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “माझ्या वडिलांच्या दासीशी तू शरीर संबध का ठेवतोस?”

2 शमुवेल 5:13

हेब्रोनहून आता दावीद यरुशलेम येथे आला. तेथे त्याने आणखी लग्ने केली आणि त्याच्याकडे आता अधिक दासी आणि बायका होत्या. यरुशलेम येथे त्याच्या आणखी काही मुलांचा जन्म झाला.

2 शमुवेल 16:22

मग सर्वांनी घराच्या धाब्यावर अबशालोमसाठी राहुटी ठोकली. अबशालोमने आपल्या वडीलांच्या दासींशी लैंगिक सैंबंध ठेवले. ही गोष्ट सर्व इस्राएलांनी पाहिली.

2 शमुवेल 19:5

यवाब राजाच्या निवासस्थानी आला आणि त्याला म्हणाला, “आपल्या सेवकांना तू आज मान खाली घालायला लावली आहेस. तुझ्या सेवकांनी तुझा जीव वाचवला. तुझी मुले, मुली, बायका दासी यांचे प्राण वाचवले.

2 शमुवेल 20:3

दावीद यरुशलेममधील आपल्या घरी परतला. आपल्या दहा दासींना त्याने घराच्या निगराणीसाठी मागे ठेवले होते. त्यांना त्याने एका खास घरांतठेवले. त्यांच्यावर पहारा ठेवला. मरेपर्यंत या बायका तेथेच राहिल्या दावीदाने त्यांच्या उदरनिर्वाहाची सगळी नीट व्यवस्था केली पण पुन्हा त्यांच्याशी संबंध ठेवले नाहीत. त्यामुळे शेवटपर्यंत त्यांची स्थिती विधवेसारखी होती.

1 राजे 4:8

त्या बारा कारभाऱ्यांची नावे अशी:बेन-हूर हा एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशावर अधिकारी होता.

1 राजे 11:3

त्याला सातशे बायका होत्या. (त्या सर्व इतर देशांच्या प्रमुखांच्या मुली होत्या) उपपत्नी म्हणून त्याला आणखी तीनशे दासीही होत्या. ह्या बायकांनी त्याला देवापासून दूर जाण्यास भाग पाडले.

2 इतिहास 11:21

रहबामचे आपल्या इतर पत्नी आणि उपपत्नी यांच्यापेक्षा माकावर अधिक प्रेम होते. माका अबशालोमची नात. रहबामला अठरा पत्नी आणि साठ उपपत्नी होत्या. त्याला अठ्ठावीस मुलगे आणि साठ मुली होत्या.

एस्तेर 2:14

संध्याकाळी ती राजाकडे जाई. सकाळी ती दुसऱ्या अंत:पूरात परत येत असे. तिथे शाशगज नांवाच्या खोजाकडे तिला हवाली केले जाई. शाशगज हा राजाच्या उपपत्न्यांची देखरेख करणारा खोजा होता. राजाला जी मुलगी पसंत पडेल तिला तो नांव घेऊन बोलवे. एरवी या मुली पुन्हा राजाकडे जात नसत.

गीतरत्न 6:8

तिथे कदचित 60 राण्या आणि 80 दासीअसतील आणि तरुण स्त्रिया अगणित असतील.

दानीएल 5:3

म्हणून यरुशललेमच्या देवाच्या मंदिरातून आणलेले सोन्याचे प्याले त्यांनी आणले.राजा, दरबारी, राण्या व दासी हे त्यातून मद्य प्यायले.

मलाखी 2:15

पती-पत्नींनी शरीरांनी व मनांनी एक व्हावे अशी देवाची इच्छा आहे. का? मग त्यांची मुलेही पवित्र होतील. म्हणून आध्यात्मिक ऐक्याचे रक्षण करा. तुमच्या पत्नीला फसवू नका. तुमच्या तारुण्यापासून ती तुमची अधार्गांगिती आहे.

मत्तय 2:6

“हे बेथलहेमा, यहूद्यांच्या भूमिप्रदेशा, तू यहूद्यांच्या राज्यकर्त्यामध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही कारण माझ्या इस्राएल लोकांचा सांभाळ करील, असा राज्यकर्ता तुझ्यातून येईल.”

Interlinear

Choose Theme