त्याने यहूदी लोकांना परमेश्वर देवाला अनुसरायची आज्ञा केली. त्यांच्या पूर्वजाचा देव तोच. त्या परमेश्वराने घालून दिलेल्या आज्ञा आणि नियम पाळायला फर्मावले.
Cross references
मी अब्राहामाबरोबर एक विशेष करार केलेला आहे, तो यासाठी की त्याने आपल्या मुलांना व वंशजाना देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याची आज्ञा करावी आणि त्यांनी न्यायनीतीने चालावे; मग मी परमेश्वर त्याला मी दिलेल्या वचनाप्रमाणे जे द्यायचे ते देईन.”
“पण कदाचित् या परमेश्वराची सेवा करणे तुमच्या मनात नसेल. तर ती निवड आजच करा. कोणाची उपासना करायची ते ठरवा. फरात नदीच्या पलीकडच्या तीरावर तुमचे पूर्वज राहात असताना त्यांनी ज्या दैवतांची पूजा केली त्यांना तुम्ही भजणार का? की या प्रदेशात राहणाऱ्या अमोऱ्यांचे दैवत आपले मानणार? तुमचे तुम्हीच ते ठरवा. मी आणि माझे कुटुंबीय यांच्यापुरते बोलायचे तर आम्ही याच परमेश्वराची सेवा करु.”
त्याच्या घराण्याचे पारिपत्य करीन असे मी एलीला म्हणालो होतो. आपल्या बहकलेल्या मुलांचे वागणे बोलणे परमेश्वराविरुध्द आहे हे त्याला माहीत असून त्यांना तो ताळ्यावर आणू शकलेला नाही, म्हणून मी हे करणार आहे.
इस्राएलच्या सर्व वंशातील जे लोक इस्राएलचा देव परमेश्वर याच्याशी एकनिष्ठ होते ते ही, लेवींनी इस्राएल सोडल्यावर, परमेश्वराला यज्ञार्पणे करण्यासाठी यरुशलेमला आले.
त्यांनी सात बैल, सात मेंढे, सात कोकरे आणि सात बोकड पापार्पणासाठी आणले. यहूदाचे राज्य, परमेश्वराचे पवित्र स्थान आणि यहूदीलोक यांच्या शुध्दीप्रीत्यर्थ हे प्राणी होते. अहरोनचे वंशज असलेल्या याजकांना हिज्कीयाने ते प्राणी परमेश्वराच्या वेदीवर अर्पण करायची आज्ञा केली.
मग हिज्कीयाने वेदीवर होमार्पण करण्याची आज्ञाकेली. त्याला सुरुवात होताच परमेश्वराचे भजन स्तवनही सुरु झाले. कर्णे आणि इस्राएलचा राजा दावीद याची वाद्ये यांचा गजर सुरु झाला.
हिज्कीया आणि सरदार यांनी लेव्यांना परमेश्वराची स्तोत्रे गाण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यानी दावीद आणि द्रष्टा आसाफ यांनी रचलेली स्तोत्रे म्हटली. या स्तवनांनी ते आनंदित झाले. सर्वांनी लवून नमस्कार करुन देवाची आराधना केली.
पुढे परमेश्वराच्या कृपेनेच असे घडून आले की राजा हिज्कीया आणि त्याचे सरदार यांच्या आज्ञेप्रमाणे वागायला यहूदाचे लोक तयार झाले. अशा रितीने त्यांनी देवाचा शब्द पाळला.
नंतर त्याने परमेश्वराची वेदी स्थापन केली आणि त्यावर शांतिअर्पणे आणि उपकार स्मरणाची अर्पणे वाहिली. समस्त यहूदी लोकांना त्याने इस्राएलाचा परमेश्वर देव याची उपासना करायची आज्ञा केली.
मग त्याने यरुशलेम आणि बन्यामिन मधील लोकांना ही या करारपालनात सामील करुन घेतले. यरुशलेमचे लोक आपल्या पूर्वचांच्या देवाचा कारार पाळू लागले.
त्याने मग यहुदा आणि यरुशलेमच्या प्रत्येक ठिकाणी दवंडी पिटवली. बंदिवासातून आलेल्या समस्त यहुदी लोकांना त्याने यरुशलेममध्ये जमायला सांगितले
त्या खोल्या शुध्द आणि स्वच्छ करून घ्यायची मी आज्ञा दिली. मग मंदिरातील पात्रे, वस्तू, धान्यार्पणे, धूप वगैरे मी पूर्ववत तिथे ठेवले.
म्हणून मी केले ते असे: दर शुक्रवारी रात्री अंधार पडण्यापूर्वी द्वारपालांना मी यरुशलेमच्या वेशींचा कडेकोट बंदोबस्त करायला सांगितले. शब्बाथ दिवस होऊन गेल्याखेरीज दरवाजे उघडायचे नाहीत असा आदेश देला. माझी काही माणसे मी वेशीवर उभी केली. शब्बाथ दिवशी कोणताही माल यरुशलेममध्ये येत नाही याची खात्री करून घ्यायला मी त्यांना सांगितले.
मी अगदी कसोशीने पवित्र शुध्द आयुष्य जगेन. परमेश्वरा, तू माझ्याकडे कधी येशील?
मी मनापासून देवाची सेवा करायचा प्रयत्न करतो. देवा, तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी मला मदत कर.
म्हणून फार उशीर होण्याआधी परमेश्वराला शोधा. तो जवळ असतानाच त्याला बोलवा.
परमेश्वर इस्राएल राष्ट्राला असे सांगतो, “मला शरण या आणि जगा.