त्यांनी सात बैल, सात मेंढे, सात कोकरे आणि सात बोकड पापार्पणासाठी आणले. यहूदाचे राज्य, परमेश्वराचे पवित्र स्थान आणि यहूदीलोक यांच्या शुध्दीप्रीत्यर्थ हे प्राणी होते. अहरोनचे वंशज असलेल्या याजकांना हिज्कीयाने ते प्राणी परमेश्वराच्या वेदीवर अर्पण करायची आज्ञा केली.
Cross references
“जर अभिषेक झालेल्या याजकाने लोकावंर दोष येईल असे पाप केले तर आपल्या पापाबद्दल त्याने पापार्पण म्हणून कोणताही दोष नसलेला एक गोऱ्हा परमेश्वरासाठी अर्पावा.
“जर तुम्ही काही चूक केली आणि परमेश्वराने मोशेला दिलेल्या एखाद्या आज्ञेचे पालन करायला विसरलात तर तुम्ही काय कराल?
बलाम म्हणाला, “इथे सात वेद्या बांधा आणि माझ्यासाठी सात बैल आणि सात मेंढे तयार ठेवा.”
तेव्हा बालाक बलामला पिसगाच्या माथ्यावरील सोकिमाच्या माव्व्यावरघेऊन गेला. तेथे बालाकने सात वेद्या बांधल्या. नंतर बालाकने प्रत्येक वेदीवर एक बैल आणि एक मेंढा बळी दिला.
बलाम म्हणाला, “इथे सात वेद्या बांध. नंतर सात बैल आणि सात मेंढे बळी देण्यासाठी तयार कर.”
करार कोश उचलून आणणाऱ्यांना देवाने साहाय्य केले. त्यांनी सात गोऱ्हे आणि सात मेंढे यांचे यज्ञार्पण केले.
त्यांनंतर बंदिवासातून परत आलेल्या यहुद्यांनी इस्राएलच्या देवाला यज्ञार्पणे वाहिली. सर्व इस्राएलकरता बारा बैल, शहाण्णव मेंढे, सत्याहत्तर नर कोकरे, पापार्पणासाठी बारा बोकड एवढे सगळे त्यांनी देवाला यज्ञात अर्पण केले.
म्हणून अलीफज, आता सात बैल आणि सात एडके घे. ते घेऊन माझ्या सेवकाकडे, ईयोबाकडे जा. त्यांना मार आणि त्यांचा स्वत:साठी होमबली अर्पण कर. माझा सेवक ईयोब तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि मी त्याच्या प्रार्थनेला उत्तर देईन. मग मी तुम्हाला योग्य असलेली शिक्षा देणार नाही. तुम्ही अतिशय मुर्ख होता म्हणून तुम्हाला शिक्षा करायला हवी. तुम्ही माझ्याविषयी नीट बोलला नाही. परंतु माझा सेवक ईयोब मात्र माझ्याबद्दल अगदी योग्य बोलला.”
सणाच्या सात दिवसात राजा सात निर्दोष बैल व सात निर्दोष मेंढे ह्यांचे देवाला हवन करील. राजा प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे सात बैल अर्पण करील. तसेच पापार्पण म्हणून रोज एक बोकड देईल.
ज्याच्याठायी पाप नव्हते त्याला आमच्यासाठी देवाने पाप केले. यासाठी की त्याच्यामध्ये आम्ही देवाचे नीतिमत्व व्हावे.