Home Bibles एज्रा 10:7 · मराठी बायबल
एज्रा 10:7 · मराठी बायबल

त्याने मग यहुदा आणि यरुशलेमच्या प्रत्येक ठिकाणी दवंडी पिटवली. बंदिवासातून आलेल्या समस्त यहुदी लोकांना त्याने यरुशलेममध्ये जमायला सांगितले

Cross references

2 इतिहास 30:5

बैर - शेबा पासून दान पर्यंत इस्राएलभर त्यांनी दवंडी पिटली. वल्हांडणासाठी यरुशलेमला यायला सर्व लोकांना आवाहन करण्यात आले. मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या पारंपारिक पध्दतीने बहुसंख्य लोकांनी फार वर्षात हा सण साजरा केला नव्हता.

एज्रा 1:1

कोरेश पारसचा राजा असताना त्याच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने त्याला एक घोषण करायला उद्युक्त केले. कोरेशने राज्यभर या फर्मानाची दवंडी पिटवली तसेच ते लिहूनही काढले. यिर्मयाच्या तोंडून परमेश्वराने वदविलेले वचन प्रत्यक्षात यावे म्हणून देवाची ही प्रेरणा होती. घोषणा पुढीलप्रमाणे होती:

Interlinear

Choose Theme