शमाया हा संदेष्टा आणि इद्दो हा द्रष्टा यांच्या इतिहासात रहबामने आपल्या कारकीर्दीत केलेल्या सर्व गोष्टींची साद्यंत हकीकत आहे. शमाया आणि इद्दो वंशाळींचा इतिहास लिहीत. रहबाम आणि यराबाम या दोघांमध्ये नित्य लढाया होत.
Cross references
शमाया नामक देवाच्या माणसाशी या सुमारास परमेश्वर बोलला. तो म्हणाला,
‘यहूदाच्या राजांचा इतिहास’ या ग्रंथात राजा रहबामच्या सर्व गोष्टींची नोंद आहे.
राजा दावीदाचे साद्यंत वृत्त संदेष्टा शमुवेल याच्या ग्रंथात, संदेष्टा नाथानच्या ग्रंथात तसेच गाद या संदेष्ट्याचा ग्रंथात नमूद केलेले आहे.
शलमोनाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यागोष्टी केल्या त्या नाथान या संदेष्ट्याच्या इतिहासात तसेच, अहीया शिलोनी याच्या संदेशलेखात आणि इद्दो या भविष्यावत्याच्या ‘इद्दोची दर्शने’ यात नोंदवलेल्या आहेत. नबाटाचा मुलगा यराबाम याविषयीही इद्दोने लिहिलेले आहे.
पण परमेश्वराचा माणूस शमाया याच्याकडे परमेश्वराचा संदेश आला. परमेश्वर त्याला म्हणाला,
तेव्हा शमाया हा संदेष्टा रहबाम आणि वडीलधारी मंडळी यांच्याकडे आला. शिशकच्या धास्तीने ही सर्व वडीधारी मंडळी यरुशलेमला जमली होती. शमाया रहबामला आणि या सर्वांना म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे ‘रहबाम, तू आणि यहूदाचे लोक यांनी माझा त्याग केला आहे. तुमचे आचरण माझ्या नियमांच्या विरुध्द आहे. तेव्हा मीही तुम्हाला सोडून शिशकच्या हाती दिले आहे.”
इस्राएलचा राजा यराबामच्या कारकीर्दीच्या अठराव्या वर्षी अबीया यहूदाचा राजा झाला.
त्याने यरुशलेममध्ये तीन वर्षे राज्य केले. मीखाया ही अबीयाच्री आई. गिबा नगरातील उरीएलची ती मुलगी. अबीया आणि यराबाम यांच्यामध्ये लढाई जुंपली.
इद्दो या भविष्याद्याच्या नोंदवह्यांमध्ये अबीयाने केलेल्या इतर सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत.
‘यहूदा आणि इस्राएल राजांचा इतिहास’ या पुस्तकात आसाच्या कारभाराचे साद्यंत वर्णन आहे.
“हनानीचा पुत्र येहू याच्या बखरीमध्ये यहोशाफाटच्या बाकीच्या कृत्यांची साद्यंंत नोंद आहे. ‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या ग्रंथातही या गोष्टींचा समावेश करुन त्यांची नोंद केली आहे.
आहाजच्या बाकीच्या गोष्टी आणि त्याचे सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे आचरण ‘यहूदा व इस्राएल राजांचा इतिहास’ या पुस्तकात लिहिलेले आहे.